सुंदर आणि घनदाट केसांसाठी तेल लावणे अतिशय आवश्यक आहे. तेल न लावल्यास केस कमकुवत होऊन तुटण्याची तसेच गळण्याची शक्यता असते. तेलामुळे कोरडे केस, कोंडा तसेच केसांशी संबंधित अन्य समस्या कमी होण्यास मदत मिळते.
तेलामुळे आपल्या केसांना पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे आठवड्यातून दोन वेळा केसांना तेल लावावे. पण आंघोळीपूर्वी केसांना तेल लावावे. आज आम्ही तुम्हाला आंघोळीपूर्वी केसांना तेल लावल्याने काय फायदे होतील याची माहिती देणार आहोत.
आंघोळीपूर्वी केसांना तेल लावून नंतर केस धुतल्यास कोरडेपणाचा त्रास होणार नाही. तेल लावल्याने केसांना पूर्ण पोषण मिळते आणि टाळू देखील निरोगी राहते. तसेच टाळू आणि कोरड्या केसांची समस्या कमी होते.
केस धुण्याआधी तेल लावल्यास केसांना चिकटपणाची समस्या उद्भवणार नाही. त्याच वेळी, जर तुम्हाला असे वाटत असेल की केसांना चिकटपणाची समस्या येऊ नये, तर तुम्ही केस धुण्यापूर्वी तेल लावा.
आंघोळीपूर्वी केसांना तेल लावल्याने केस मजबूत होतात. यासोबतच केस कमकुवत आणि निर्जीव होण्याची समस्याही कमी होईल.
केसांना तेल लावल्यास केसांची वाढही होते. तेल लावल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्यामुळे केसांची चांगली वाढ होते.
केसांना नियमित तेल लावल्यास कोंडा आणि टाळूला येणारी खाज कमी होण्यास मदत मिळेल. तेलामध्ये कडुलिंबाची पाने गरम करून घ्या आणि आंघोळ करण्यापूर्वी या तेलानं मसाज करावा. यानंतर कोमट पाणी आणि शॅम्पूने केस धुवावे.
केस धुण्यापूर्वी तेल लावावे.
तेल कोमट करून लावावे.
तेल लावून केसांना मसाज करा.
1 तासानंतर केस धुवा.
केस धुण्यापूर्वी शॅम्पू वापरा.