Mustard Oil Bad for Hair : सानिकाचे केस घनदाट होते. पण त्यांना वाढ नव्हती. अनेक डॉक्टर, आयुर्वेदीक औषधे झाली तरीही केसांची वाढ होत नव्हती. युट्युबवर तिने मोहरीच्या तेलाने केस वाढतात, असं पाहिलं. तो प्रयोग तिने करूनही पाहिला. पण तिच्या पदरी निराशाच आली.
मोहरीचे तेल अनेकांनी स्वयंपाकासाठी वापरले असेल. त्याचे अनेक फायदेही असतील. पण मोहरीचे तेल केसांसाठी लाभदायक ठरत नाही. ते तेल केसांना लावल्याने केसांचे नुकसान होते, केस गळती सुरू होते.
मोहरीचे तेल केसांना लावल्यामुळे केसांच्या मुळांमध्ये जाऊन चांगले पोषण देते. याला हेअर मास्कसारखे लावले जाऊ शकते. मोहरीच्या तेलामध्ये मिळणारे नैसर्गिक फॅट्स हे केसांना चांगले फायबर मिळवून देण्याचे काम करते.
यामुळे तुमच्या केसांवर बाहेरील प्रदूषणाचा कोणताच परिणाम होत नाही. हे तेल तुमच्या केसांना चमकदार आणि मुलायम बनवते. असे फायदे असताना सानिकाच्या केसांना का बरं नुकसान झेलावे लागले. याबद्दल जाणून घेऊयात.
पहिली गोष्ट म्हणजे, मोहरीच्या तेल कसे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते किती शुद्ध आहे. आजच्या काळात तुम्हाला मोहरीच्या तेलात अनेक प्रकारची भेसळ पाहायला मिळेल आणि ते लावणे केसांसाठी हानिकारक ठरू शकते. दुसरे म्हणजे, मोहरीच्या तेलाचे रेणू तुमच्या केसांच्या फोलिकल्सला ब्लॉक करतात, ज्यामुळे केसांना खूप नुकसान होऊ शकते.
केस सातत्याने गळू शकतात
मोहरीचे तेल केस गळण्यास कारणीभूत ठरू शकते.मोहरीच्या तेलाचे रेणू जाड असतात ज्यामुळे स्कॅल्पची छिद्रे ब्लॉक होतात आणि त्यामुळे तुमचे केस लवकर गळतात.
तसेच, हे तेल लावल्याने तुमच्या केसांमध्ये पोषणाची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तुमचे केस कमकुवत होऊ शकतात आणि तुटतात.
तेलकट केसांसाठी हानिकारक
तेलकट केसांसाठी चांगले नाही मोहरीचे तेल तेलकट केसांसाठी अजिबात योग्य नाही. यामुळे तुमचे केस आणखी तेलकट होऊ शकतात आणि त्यांचा स्वभाव खराब होऊ शकतो.
तसेच, या तेलाचे रेणू केसांमध्ये जमा होऊ शकतात, ज्यामुळे तुमचे केस शॅम्पू केल्यानंतरही तेलकट दिसू शकतात. म्हणूनच तेलकट केस असलेल्या लोकांनी ते वापरणे टाळावे.
केस पांढरे होऊ शकतात
केसांना पांढरे होऊ शकतात मोहरीचे तेल केसांना लावल्याने त्यातील रसायनांमुळे कोलेजन खराब होऊ शकते. याशिवाय याचा रक्ताभिसरणावरही परिणाम होतो, ज्यामुळे तुमचे केस लवकर पांढरे होऊ शकतात. याशिवाय पोषणाच्या अभावामुळे ही समस्या आणखी वाढू शकते.
मोहरीच्या तेलाचे इतर तोटे
मोहरीच्या तेलामध्ये इरूसिक नावाचे अॅसिड असते. जे तुमच्या हृदयासाठी त्रासदायक ठरते. एका शोधानुसार, इरूसिक अॅसिड हे हृद्यातील मांसपेशीमधील लिपिडोसिस (ट्रायग्लिसराईड्स) चे कारण ठरू शकते आणि हृदयातील टिश्यूंना हानी पोहचवू शकते.
त्वचेवर याचा वापर करण्यापूर्वी त्याची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. कारण काही जणांच्या त्वचेला याची हानी होऊ शकते. अलर्जी होण्याची शक्यता असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.