Hair Care Tips : केस पांढरे झालेत, केस गळायला लागलेत, रूक्ष अन् कोरडे झालेत. या सगळ्या समस्या असतील त्यावर तेल लावा असं सांगितलं जातं. केसांसाठी अनेक प्रकारचे तेल बाजारात उपलब्ध आहेत. केसांची काळजी घेण्यासाठी आज आम्ही तेल नाही तर दुधाचा वापर करण्याचा उपाय सांगणार आहोत.
काही महिलांचे केस इतके कोरडे असतात की, त्यांच्या केसांवर कोणत्याही शँपू, क्रिम अथवा ब्युटी ट्रीटमेंटचा उपयोग होत नाही. त्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या अथवा केसगळतीची समस्या जास्त प्रमाणात होताना दिसते.
प्रदूषण आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे केस खराब होत असतील आणि केसांमध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी झाले असेल तर केस अधिक कोरडे होऊ लागतात.
तुम्ही नारळाच्या दुधाबद्दल ऐकलं असेल. नारळाच्या दुधापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनतात. त्यातही कोल्हापुरी पांढरा रस्सा, दुधगोळ्या या तर अनेकांच्या फेवरेट आहेत.हेच नारळाचे दूध केसांच्या अनेक समस्यांवर उपचार ठरू शकते. नारळाचे दूध कंडिशनरप्रमाणेच काम करू शकते.
नारळाच्या दूधातील जीवनसत्त्वे आणि खनिजे आपल्या केसांची वाढ वाढवू शकतात आणि ते आपल्या केसांचा पोत आणि रंग सुधारू शकतात. याशिवाय केसांसाठी नारळाचे दूध लावण्याचे फायदे बरेच आहेत. हे दूध कसं काढायचं आणि त्याचा वापर कसा करायचा याबद्दल जाणून घेऊयात.
व्हिटॅमिन ई आणि काही अँटीऑक्सिडंट्स आपल्या केसांची वाढ वाढवण्यासाठी प्रभावीपणे कार्य करतात आणि हे नारळाच्या दुधात देखील असते. आपल्याला फक्त आपल्या टाळूवर नारळाचे दूध लावावे लागेल.
यामध्ये तुम्ही कोरफडीची ही मदत घेऊन हे दोन्ही मिक्स करून टाळू लावू शकता. यामुळे तुमच्या केसांचे रक्ताभिसरण वाढते आणि मग केसांची वाढ वाढण्यास मदत होते. केसांसाठी देशी कंडिशनरबद्दल बोलायचे झाले तर नारळाच्या दुधापेक्षा चांगले काहीच नाही.
खरं तर यात काही बायोटिक घटक असतात जे तुमच्या खराब झालेल्या केसांना ओलावा पुरवतात आणि ज्यामुळे दुहेरी केसांची समस्या उद्भवत नाही आणि आपण केसांमध्ये तुटणे टाळू शकतो. (Hair Care)
केसांसाठी चांगले सीरम म्हणून आपण नारळाचे दूध वापरू शकता. हे आपल्या टाळूतील रक्ताभिसरण सुधारते आणि नंतर त्यांच्या कमकुवत मुळांचे पोषण करते. यामुळे केसगळती थांबते आणि सुंदर, लांब आणि निरोगी केस मिळण्यास मदत होते.
नारळाचे दूध आपण केसांसाठी अनेक प्रकारे वापरू शकतो, आपल्याला फक्त ते कसे बनवायचे हे माहित असणे आवश्यक आहे. आपल्याला प्रथम कच्चा नारळ किसून घ्यावा लागेल. किसलेलं खोबरं मिक्सरला लावून त्यात थोडंच पाणी घालून फिरवून घ्यावं.
मिक्सरच्या भांड्यातील चोथा आणि दूध वेगळं व्हावं म्हणून तुम्ही हे मिश्रण गाळू शकता. किंवा सुती कापडाने पिळून काढू शकता.
नारळाच्या दुधाचा हा हेअर पॅक लावायच्या आधी तुम्ही केस शँपूने व्यवस्थित धुवा आणि सुकवून घ्या
त्यानंतर स्काल्पचा मसाज करत हे नारळाचे दूध तुम्ही लावायला सुरूवात करा
त्यानंतर केसांच्या लांबीनुसार पूर्ण नारळाच्या दुधाचा हा हेअर पॅक लावा
केस अधिक मोठे असतील तर तुम्ही साहित्य अधिक घ्या आणि मोठे केस तुम्ही त्या मिश्रणात बुडवा
त्यानंतर केसांना शॉवर कॅप लावा
अर्ध्या तासानंतर केस थंड पाण्याने धुवा
आठवड्यातून कमीत कमी एक वेळा ही प्रोटीन ट्रिटमेंट तुम्ही करा. याचा तुम्हाला फायदा मिळेल (Hair Care Tips)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.