Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : बाहेर पाऊस अन् घरात केस गळतीचा महापूर; पावसाळ्यात या टिप्स वापरा केसगळती कमी करा

तुमच्या सवयींचा होतो केसांवर जास्त परिणाम

Pooja Karande-Kadam

Hair Care Tips :  पावसाळ्यात केस गळल्यामुळे अनेकांना त्रास होतो. चिकट हवामानात केस गळणे थांबवण्यासाठी अनेक सौंदर्य उत्पादने देखील वापरली जातात. परंतु त्यांच्या वापरामुळे केसांना दीर्घकाळ नुकसान होऊ शकते.

एखाद्या स्त्रीचे केस जर घनदाट, लांबसडक असतील तर इतर महिलांना त्याचं अप्रुप वाटतं. पण, तिला स्वत:ला त्याचं खास काही वाटत नाही. उलट त्यांची काळजी नीट घेता येत नाही म्हणून तिची चिडचिड होत असते. केसांकडे थोडजरी दुर्लक्ष झालं तरी ते गळायला लागतात. त्यामुले सगळ्या घरात केसांचेच थप्पे लागलेले दिसतात. (Hair Care Tips : Hair Care Tips: Follow these methods to control hair fall in monsoon)

केस गळती सुरूवातीपासून असेल तर काही वाटत नाही. तो एक सवयीचा भाग होऊन जातो. पण केसगळती जर अचानक सुरू झाली असेल तर मात्र विचार करण्याची गोष्ट असते. त्यावर काहीतरी उपाय करण्याचीही गरज आहे हे समजावं. केस गळतीची कारणे काय आहेत हे आधी आपण समजून घेऊयात. (Hair fall tips in marathi)

केसांना तेल न लावणे

फॅशनमुळे अनेकजण केसांना तेल लावत नाही. परंतु लक्षात ठेवा ज्याप्रमाणे आपल्याला पोट भरण्यासाठी खाण्याची गरज असते त्याचप्रमाणे केसांनाही वेळोवेळी तेलाची आवश्यकता असते. यामुळे केसांना पोषण मिळते. केसांना तेल न लावल्यामुळे आपले केस कोरडे आणि निर्जीव होतात.

खाण्याच्या विचित्र सवयी

तुमच्या नियमित खाण्या-पिण्याच्या सवयीमुळेही केस गळतात. बाहेरील तेलकट, फास्ट फूट यासारखे अनेक पदार्थांचे शरीराप्रमाणे केसांवरही विपरित परिणाम होतो. तुमच्या रोजच्या जेवणात प्रोटीन आणि आयन या घटकांची कमी असेल तर केस गळतीचे प्रमाण वाढते.

केस विंचरण्याची पद्धत

केस गळतीचे कारण तुमची केस विंचरण्याची पद्धतही असू शकते. काही जण केसांचा गुंता झाल्यास केस विंचरताना ते खेचतात. त्यामुळे ते तुटतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, केस विंचरताना ते आरामात विंचरा, त्यांना मुळापासून ओढू नका. यामुळे केस कमजोर होऊन ते तुटतात. (Hair fall remedies)

या आणि अशा अनेक कारणांनी केस गळती सुरू होऊ शकते. केस गळणे थांबवण्यासाठी तुम्ही येथे दिलेल्या या पद्धती देखील वापरून पाहू शकता.

केसांसाठी तुम्ही अंडी, बदामाचे तेल आणि कढीपत्ता अशा अनेक प्रकारच्या गोष्टी वापरू शकता. या गोष्टी केस मजबूत करण्याचे काम करतात. या नैसर्गिक गोष्टी केसांसाठी कशा वापरायच्या हे पाहुयात.

अंडी आणि ऑलिव्ह ऑईल

प्रथम एका भांड्यात अंडी फोडून घ्या. त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑईल टाका. या दोन गोष्टी मिसळून टाळू आणि केसांना मसाज करा. अंडी आणि ऑलिव्ह ऑइलचा पॅक स्कॅल्पवर 30 मिनिटे राहू द्या. तुम्ही हा पॅक आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता.

ऍपल सायडर व्हिनेगर आणि बदाम तेल

एका भांड्यात एक चमचा सफरचंद व्हिनेगर घ्या. त्यात २ चमचे बदाम तेल घाला. व्हिनेगर आणि तेल मिसळून टाळूला मसाज करा. या मिश्रणाने काही मिनिटे टाळूला मसाज करा. तुम्ही आठवड्यातून किमान दोनदा व्हिनेगर आणि बदाम तेलाचे मिश्रण वापरू शकता.(Hair Care Tips)

खोबरेल तेल आणि कढीपत्ता

पावसाळ्यात केसांसाठी खोबरेल तेल आणि कढीपत्ता देखील वापरू शकता. त्यासाठी मूठभर कढीपत्ता लागेल. आता एका पॅनमध्ये ५ चमचे खोबरेल तेल गरम करा. त्यात ही पाने टाका. ही पाने काळी होईपर्यंत तळून घ्या. आता गॅस बंद करा.

मिश्रण थंड होऊ द्या. या तेलाची पाने वेगळी करा. या तेलाने डोक्याला मसाज करा. तासभर केस आणि टाळूवर ठेवा. हे तेल तुमचे केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करेल. यासोबतच तुमचे केस मुळांपासून मजबूत होतील. कढीपत्त्याचे तेल तुम्ही आठवड्यातून तीनदा वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT