प्रत्येकाला छान लांब, दाट, मजबूत केस हवे असतात. यासाठी अनेक उपाय केले जातात. काही लोक केमिकल उत्पादने वापरतात तर काही घरगुती उपाय करतात. तसेच पोषक तत्वांची कमतरता, विशेषत: प्रथिने, लोह, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12, केसांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.
मानसिक ताण, पुरेशी झोप न मिळणे आणि शरीरातील हार्मोनल बदल यामुळे केस गळतात. आजच्या काळात पातळ केसांची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. परंतु, काही घरगुती उपायांचा वापर केल्यास पातळ केस जाड होण्यास मदत होते. विशेष म्हणजे घरगुती उपायांमुळे केसांवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. चला तर जाणून घेऊया असे काही घरगुती उपाय ज्यामुळे केस घनदाट होण्यासाठी मदत होते.
कच्चा बटाटा बारीक करून त्यात कोथिंबीर घाला.
हे मिश्रण केसांना लावा आणि 30-45 मिनिटांनी केस धुवा.
या मास्कमुळे तुमचे केस जाड आणि चमकदार होतात.
एका अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला.
हे मिश्रण चांगले मिसळा आणि केसांना लावा आणि 30 मिनिटांनी केस धुवा.
हा मास्क तुमचे केस जाड आणि चमकदार बनवण्यास मदत करतो.
मेथी दाणे पाण्यात भिजवा.
त्यात थोडे नारळ पाणी टाकून मास्क बनवा.
हा मास्क केसांवर लावा आणि 30-45 मिनिटांनी केस धुवा.
या मास्कमुळे तुमचे केस जाड आणि चमकदार होतात.
तसेच, तुमच्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेल्या गोष्टींचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्या, फळे, नट्स आणि कडधान्ये तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
केस नियमित धुवा आणि स्वच्छ ठेवा. गरम पाण्याने केस धुणे टाळा, कारण त्यामुळे केस कोरडे होऊ शकतात.
आठवड्यातून एकदा खोबरेल तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइलने केसांना मसाज करा. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केसांना पोषण मिळते.
प्रदूषणापासून केसांचे संरक्षण करा. बाहेर जाताना स्कार्फ वापरा.