केसं लांब सडक, काळेभोर, दाट आणि चमकदार असवे असं अनेकींना वाटतं. मात्र अलिकडे वाढतं प्रदूषण ताण-तणाव आणि अनेक कारणांमुळे केस Hair गळण्याची, ते अकाली पांढरे आणि विरळ होण्याची समस्या निर्माण होवू लागली आहे. काहींचे केस हे आधीपासूनच विरळ आणि रुक्ष असतात. Hair Care Tips in Marathi Stop Hair Fall with Natural Products
यासाठी अलिकडे अनेक जण बाजारत उपलब्ध असलेले वेगवेगळे शॅम्पू Shampoo तेल, हेअर मास्कचा वापर करतात. यातील अनेक हेअर केअर प्रोडक्टस Hair Care Products हे अतिशय महाग असतात. या प्रोडक्टस्चा तात्पुरता परिणाम दिसून येत असला तरी भविष्यात ते धोकादायक ठरू शकतात.
खरं तर केस कुमकुवत होवू गळण्याची Hair Fall समस्या आता साधारण आहे. मात्र बदलत्या हवामानानुसार ही समस्या अधिक वाढते. उन्हाळ्यात केस अधिकच निस्तेज दिसू लागतात. घामामुळे केसांचा गुंता वाढतो. दिवसभर केस बांधल्याने ते अधिक गळतात.त्यामुळे ते अधिकच पातळ आणि निस्तेज दिसू लागतात.
जर तुम्हाला केसांची चमक पुन्हा हवी असेल, तुम्हालाही दाट आणि लांबसडक केस हवे असतील तर आम्ही तुम्हाला काही नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस चमकदार होतील.
अंड- चांगल्या आरोग्यासाठी आणि प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी अंड खाणं फायदेशीर ठरतं. मात्र हेच अंड केसांसाठी देखील तितकचं उपयुक्त ठरतं. केसांना अंड लावल्याने केस मजबूत होतात तसचं केसांना चमकही येते.
हे देखिल वाचा-
यासाठी तुमच्या केसांच्या लांबीनुसार १ किंवा २ अंडी चांगली फेटून घ्या. केसांना आणि स्कॅल्पला अंडी लावून ते अर्धा तास राहू द्या. त्यानंतर केस एखाद्या सौम्य शॅम्पूच्या मदतीने कोमट पाण्याने धुवा. अंड्यामध्ये बायोटीन आणि बी-कॉम्पेलेक्स हे विटामिनमुळे केस जाड होण्यास मदत होते.Egg for long and thick hair
ऑलिव्ह ऑईल- ऑलिव्ह ऑईलमद्ये ओमेगा-३ आणि इतर अनेक पोषक तत्व असतात. यामुळे केसांच्या एकूण आरोग्यासाठी हे तेल गुणकारी असतं. ऑलिव्ह आईलला थोडंसं कोमट करून ते केसांना आणि केसांच्या मुळांना लावाव. या तेलाने केस हलक्या हाताने मसाज करावे.
आलिव्ह ऑईल लावल्याने केस दाट होतात. तसचं केस मऊ होतात. ऑलिव्ह आईलमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असल्यामुळे कोडां दूर होण्यास मदत होते. तर आलिव्ह आईलमधील अँटीऑक्सिडंटमुळे केस वाढण्यास मदत होते.
संत्र्याचा रस- संत्री खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत .त्याचप्रमाणे संत्र्याचा रस केसांसाठी देखील उपयुक्त आहे. संत्र्यामधील पेक्टिन, विटामिन सी आणि ऍसिडमुळे केसांना नैसर्गिक चमत मिळते. तसचं केस दाट होण्यासाठी संत्र्याचा रस उपयुक्त ठरतो.
यासाठी तुम्हाला केवळ एका संत्र्याचा मिक्सरमध्ये ज्यूस काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या रसाने केसांना आणि केसांच्या मुळांना चांगलं मसाज करावं. १ तासासाठी हा रस केसांना राहू द्यावा, त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवावे. Hair care
एरंडेल तेल- एरंडेल तेलामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन ई आणि फॅटी ऍसिड उपलब्ध असतात. यामुळे केस मजबूत आणि दाट तसचं लांब होण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला या तेलाने फक्त केसांना आणि स्कॅल्पला मालिश करायचं आहे. केस धुण्यापूर्वी साधारण अर्धा तास आधी हे तेस केसांना लावावं. एरंडल तेलामध्ये रिकिनोलेइक ऍसिड असतं. ज्यामुळे केसांच्या मुळांखाली रक्ताभिसरण सुरळीतपणे सुरु राहतं. यामुळेच नियमितपणे या तेलाचा वापर केल्यास विरळ केस दाट होण्यास मदत होते. तसचं केसांची वाढही चांगली होते. How to get long hair
या चार गोष्टींच्या मदतीने तुम्ही केसांच्या समस्यां दूर करू शकता. अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या आणि कमी किमतीतील हे पदार्थ तुमचं केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होईलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.