hair sakal
लाइफस्टाइल

Hair Coloring Tips: हेअर कलर करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, केस होणार नाही खराब

Aishwarya Musale

काही लोकांना पार्लरमध्ये जाऊन महागडे हेअर ट्रीटमेंट घेणे आवडत नाही. अशा परिस्थितीत केसांना कलर करायचे असेल तर ते घरीच करून बघतात. म्हणूनच आपण बाजारातून कलर प्रोडक्ट्स विकत घेतो आणि केसांना लावतो.

हेअरस्टायलिस्ट या संदर्भात काही सल्ला देतात. कारण जेव्हा तुम्ही घरी केसांना कलर करता तेव्हा तुमच्याकडून काही ना काही चुका होतात, ज्यामुळे तुमच्या केसांची स्थिती बिघडते. आज आपण त्या चुकांबद्दल जाणून घेऊ आणि त्या करणे टाळू.

जर तुम्हाला असे वाटत असेल की केसांना घरी कलर केल्यांनतर त्यांचा रंग दीर्घकाळ टिकून राहावा, तर काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जरी काही लोक पांढरे केस काळे करण्यासाठी पावडर वापरतात.

जर तुम्हाला ते लावण्याची योग्य पद्धत माहित नसेल तर काही दिवसात त्याचा कलर निघून जातो. म्हणूनच जाणून घेऊया केसांना कलर करण्याची योग्य पद्धत.

घरी केस कलर करताना या गोष्टी लक्षात ठेवा-

1. हेअर वॉश करा

जेव्हाही तुम्ही केसांना कलर करणार असाल, त्याआधी केसांना शॅम्पू करा. घरी केस कलर करताना याची विशेष काळजी घ्या.

2. जास्त वेळ कलर ठेवू नका

जर तुम्ही घरी हेअर कलर लावत असाल तर लक्षात ठेवा की हा रंग जास्त काळ केसांवर ठेवू नये. जर तुम्ही तुमच्या केसांना जास्त काळ कलर लावलात तर तुमच्या टाळूला कलर येण्याचा धोका असतो. मग अनेक दिवस शॅम्पू करूनही ते जात नाही.

3. कंडिशनर लावणे आवश्यक आहे

केसांना कलर केल्यानंतर चांगले कंडिशनर लावावे. कारण कलरिंगनंतर केसांचे कंडिशनिंग खूप महत्त्वाचे असते. यामुळे केसांचे पोषण आणि चमक राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गाडी मुंब्रा बायपासवर आली, तेव्हाच अक्षयने बंदूक खेचली अन्... अखेर पोलिसांनी घटनाक्रम सांगितला!

अक्षयला कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी व्हायला हवी होती; गृह विभागाचा हलगर्जीपणा संशयास्पद, शरद पवारांची प्रतिक्रिया

आरोपी Akshay Shinde याच्या मृत्यूमागे रश्मी शुल्कांचा हात, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

Akshay Shinde Encounter: ''स्वसंरक्षण की हत्या?'' अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उपस्थित होताएत 'हे' प्रश्न; न्यायमूर्तींमार्फत चौकशीची मागणी

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर वेळी नक्की काय घडलं? पोलिसांवर का व्यक्त केला जातोय संशय? वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT