Hair Care Tips google
लाइफस्टाइल

Hair Care Tips : हे घरगुती उपाय वाढवतील केसांची चमक

काही नैसर्गिक पर्याय तुमच्या घरी उपलब्ध आहेत, जे तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात आणि गमावलेली चमक परत आणू शकतात.

नमिता धुरी

मुंबई : प्रदूषण आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींचा परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो. यामुळे केस कमकुवत होतात त्यामुळे तुटतात आणि गळतात देखील. एवढेच नाही तर केसांची चमकही नाहीशी होते.

तुमच्या केसांना चमकदार बनवण्यासाठी आणि त्यांना निरोगी बनवण्यासाठी आपल्याला अनेक रासायनिक पर्याय सापडतील, परंतु काही नैसर्गिक पर्याय तुमच्या घरी उपलब्ध आहेत, जे तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात आणि गमावलेली चमक परत आणू शकतात.

कोरफडीमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते. जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर तुमच्यासाठी एलोवेरा जेल खूप फायदेशीर आहे. तसेच, ते तुमच्या केसांना चमक देईल. कोरफडीचे जेल केसांच्या मुळापासून केसांच्या लांबीपर्यंत लावू शकता.

मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. कोरड्या केसांसाठी हे खूप फायदेशीर आहे. हे कोरडेपणा दूर करते तसेच केसांना चमक देते. तुम्ही मधात थोडेसे गुलाबपाणीही मिसळू शकता. केसांवर मध 30 मिनिटांपेक्षा जास्त ठेवू नका.

लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी देखील असते, परंतु ते थेट लावल्याने टाळूवर ऍलर्जी होऊ शकते. अशा स्थितीत खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून केसांना लावावा. असे केल्याने केसांमध्ये चमक येण्यासोबतच कोंड्याची समस्याही कमी होते.

दही हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर आहे. तुम्ही ते थेट केसांवर देखील लावू शकता किंवा तुम्ही त्यात अंड्याचा पांढरा भाग घालून केसांना लावू शकता. यामुळे तुमच्या निर्जीव केसांना जिवंतपणा येतो आणि ते चमकतात.

नारळाच्या पाण्याने केसांमधील व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण होते. यामध्ये प्रथिने देखील भरपूर असतात. केसांमध्ये प्रोटीनची कमतरता असल्यास केसांची वाढ थांबते आणि ते गळू लागतात. अशा परिस्थितीत नारळ पाणी तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT