पावसाळ्यात केसांची चांगली काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यामध्ये केस कोरडे होतात. कोरडे केस झाल्याने केस गळतीची समस्या निर्माण होते. खरंतर घराबाहेर पडल्यावर अनेक वेळा केस ओले होतात किंवा आपण कधीतरी आवडीने पावसात भिजतो. मात्र यामुळे केस चिकट आणि कोरडे होतात. चला तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगतो. तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही पावसाळ्यात कोरड्या केसांच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
या ऋतूमध्ये पावसाच्या पाण्याने केस भिजले की केस कोरडे होण्याची समस्या उद्भवते. जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर तुमचे केस शॅम्पूने चांगले धुवा. यानंतर केसांना कंडिशनरही लावा. या ऋतूमध्ये केस कोरडे होण्याची समस्या टाळण्यासाठी आठवड्यातून दोनदा केस चांगले धुवा.
या ऋतूत केस स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे असतानाच केसांना मसाजही करायला हवा. या ऋतूमध्ये केसांना नीट मसाज करा आणि केस धुण्यापूर्वी करा. केस धुण्याआधी तेल लावून केसांना नीट मसाज करा.
कोरड्या केसांची समस्या टाळण्यासाठी हेअर मास्कचाही वापर केला जाऊ शकतो. हेअर मास्क वापरल्याने केसांना पूर्ण पोषण मिळण्यासोबतच केसही मजबूत होतील. केस धुण्याआधी हेअर मास्क वापरा. तुमच्या केसांसाठी कोणता हेअर मास्क योग्य असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तज्ञाची मदत घेऊ शकता.