hair care sakal
लाइफस्टाइल

Homemade Serum For Hair : केसाचं गळणं ताबडतोब थांबवेल 'हे' होममेड हेअर सिरम, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

केस गळणे, केसांची वाढ न होणे, केसात कोंडा होणे अशा अनेक समस्यांमुळे केसांचे आरोग्य बिघडते. अशा परिस्थितीत तुम्ही कांद्याच्या मदतीने हेअर सीरम घरीच बनवू शकता.

सकाळ डिजिटल टीम

महिलेला खरे रुप हे केसांमुळे येते असे अनेकदा मोठी माणसे म्हणतात. त्यामुळे बऱ्याच महिला आपल्या केसांची योग्य प्रकारे काळजी घेतात. विशेष म्हणजे बऱ्याच महिला केसांचे आरोग्य जपण्यासाठी अनेक उत्पादने खरेदी करुन केसांची निगा राखतात.

केस गळणे, केसांची वाढ न होणे, केसात कोंडा होणे अशा अनेक समस्यांमुळे केसांचे आरोग्य बिघडते. अशा परिस्थितीत तुम्ही कांद्याच्या मदतीने हेअर सीरम घरीच बनवू शकता. हे लावल्याने केस गळणे कमी होते. शिवाय त्यांची वाढही चांगली होईल. आम्ही तुम्हाला हेअर सीरम बनवण्याची पद्धत सांगतो.

हेअर सीरम बनवण्यासाठी लागणारे साहित्य

कांदा - अर्धा चिरलेला

एलोवेरा जेल- 2 चमचे

खोबरेल तेल - 2 चमचे

हेअर सीरम बनवण्याची पद्धत

यासाठी तुम्हाला एका कांद्याचे दोन तुकडे करावे लागतील.

नंतर त्याची साल काढावी लागेल.

आता कांदा बारीक करून घ्या.

मग तुम्हाला ते पिळून त्याचा रस काढावा लागेल.

एक वाटी घ्या. त्यात एलोवेरा जेल आणि खोबरेल तेल नीट मिक्स करा.

यानंतर त्यात कांद्याचा रस घालून मिश्रण मिक्स करावे.

आता एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा.

केसांना हेअर सीरम कसा लावायचा

तुमचे हेअर सीरम तयार झाल्यावर ते तुमच्या हातांच्या मदतीने स्कॅल्पवर लावा.

सीरम लावण्यापूर्वी आपले केस धुवा.

नंतर ते स्कॅल्पला लावून चांगले मसाज करा.

आता ते केसांवर 30 मिनिटे राहू द्या.

त्यानंतर केस शॅम्पूने धुवा.

हे तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा केसांना लावू शकता.

केसांना हेअर सीरम लावण्याचे फायदे

केसांना सीरम लावल्याने केस चमकदार आणि निरोगी दिसतात.

हेअर सीरम कुरळे केसांसाठी चांगले आहे.

हे लावल्याने केसांची वाढ चांगली होते. तसेच, ते जाड आणि दाट दिसतात.

केसांना कांद्याचे सिरम लावा. यामुळे तुमचे केस गळणे कमी होईल. तसेच केसांची वाढ सुधारेल. पण हे सीरम जास्त काळ साठवून ठेवू नका.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT