Hair Cut Tips: Sakal
लाइफस्टाइल

Hair Cut Tips: तुमची हेअर कट बिघडल्यास करा 'या' गोष्टी, मिळेल परफेक्ट लूक

Hair Cut Tips: तुमची हेअर स्टाइल बिघडली असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अॅक्सेसरीज वापरू शकता. यामुळे तुम्हाला परफेक्ट लूक मिळेल.

पुजा बोनकिले

Hair Cut Tips: अनेक लोक लूक बदलण्यासाठी हेअर कट करतात. केस चांगले कापले तर चेहहा अधिक सुंदर दिसतो. पण तेच जर केस कापण्यात बिघडले तर चेहरा देखील खराब दिसतो. खासकरून महिला वारंवारं केस कापत असतात. वेगवेगळ्या हेअर स्टाइलमुळे चेहऱ्याचा लूकही खूप सुंदर दिसतो, पण कधी कधी असं होतं की हेअर स्टायलिस्टच्या निष्काळजीपणामुळे केस बिघडतात. असे झाल्यावर घाबरू नका. कारण तुम्ही पुढील टिप्सच्या मदतीने स्वत:चा लूक परफेक्ट बनवू शकता.

अॅक्सेसरीजचा वापर

तुमची हेअर स्टाइल बिघडली असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अॅक्सेसरीज वापरू शकता. यामुळे तुम्हाला नवीन लूक मिळेल. यासाठी तुम्ही स्क्रंची, हेअर बँड, रंगीत क्लिप आणि रबर वापरून सुंदर लूक मिळू शकतो.

मेसी हेअर स्टाइल

जर तुमची हेअर कट बिघडली खराब झाले असतील तर केस कधीही सरळ करू नका. सरळ केल्याने तुमची बिघडलेली हेअर स्टाइल दिसून येईल. केसांना नेहमी रोल करून ठेवा.

वेगळी हेअर कट करू नका

जर तुमचे हेअरकट खूप खराब झाले असेल तर घाबरू नका. तुम्ही हेअर स्टायलिस्ट सांगून नविन हेअर कट करू शकता. केस कापतांना चांगल्या ठिकाणी कापावे. यामुळे तुमचे केस खराब होणार नाही.

मल्टी लेयर्स करावे

जर केस मागून वर आणि खाली कापले गेले असतील तर तुम्ही मल्टी लेअर्स करू शकता. तुम्हाला मल्टी लेयर हेअर कटमुळे सुंदर लूक मिळू शकतो. तुमचे केस लांब असेल तर ही हेअर कट सहज करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT