Hair Damage esakal
लाइफस्टाइल

Hair Damage : डॅमेज झालेल्या केसांना रिपेयर कसं कराल? जाणून घ्या 5 टिप्स, केस सिल्की होतील

चला तर मग जाणून घेऊया ब्युटी एक्सपर्ट पूजा गोयल यांच्याकडून, डॅमेज झालेले केस दुरुस्त करण्याच्या पद्धतींबद्दल.

साक्षी राऊत

Hair Damage : प्रत्येकाला मुलायम आणि सिल्की केस हवे असतात. परंतु पाण्याचा फरक, प्रदूषण आणि केसांची योग्य काळजी न घेतल्याने अनेकदा केस डॅमेज आणि रफ होतात. डॅमेज केस कोणाला आवडेल बरं? तसेच डॅमेज केसांमुळे लूकही खराब दिसू लागतो. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक केसांना मुलायम आणि सुंदर बनवण्यासाठी केरॅटिन किंवा स्पा ट्रिटमेंट घेतात.

पण केसांच्या सगळ्याच ट्रिटमेंट महाग असतात. म्हणूनच प्रत्येकजण इतका खर्च करू शकत नाही. तेव्हा तुम्ही डॅमेज हेअर रिपेअर करण्यासाठी हे काही सोपे उपाय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया ब्युटी एक्सपर्ट पूजा गोयल यांच्याकडून, डॅमेज झालेले केस दुरुस्त करण्याच्या पद्धतींबद्दल.

डॅमेज हेअर रिपेअर कसे कराल?

१) रोज केस धुणे टाळा

रोज केस धुतल्याने केस खराब होतात आणि निर्जीव होऊ शकतात. त्यामुळे तुमचे केस आधीच खराब झाले असतील तर तुम्ही रोज केस धुणे टाळावे. रोज केस धुण्याने सेबम निघून जातो. सेबम हे एक नैसर्गिक तेल आहे, जे केसांमध्ये मऊपणा राखते. सेबम केसांना मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत करते. अशात जर तुम्ही तुमचे केस रोज धुतले तर सेबम कमी होईल. यामुळे केस कोरडे, खराब आणि निर्जीव होतील. केसांचे नुकसान टाळण्यासाठी किंवा डॅमेज रिपेअरसाठी तुम्ही दररोज केस धुणे टाळावे.

२) हेअर आयलिंग करा

ज्या पद्धतीने बॉडी मसाज आवश्यक आहे. त्याचप्रमाणे केसांना तेल लावणे देखील खूप महत्वाचे आहे. केसांना तेल लावल्याने खराब झालेले केस दुरुस्त होण्यास मदत होते. हेअर ऑइलिंग केसांना मॉइश्चरायझ करते आणि केसांचे सौंदर्य वाढवते. केसांना तेल लावण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल, खोबरेल किंवा बदामाचे तेल वापरू शकता. कोणतेही तेल घेऊन ते कोमट करावे. आता या तेलाने केस आणि टाळूला नीट मसाज करा. एक ते दोन तासांनी केस माइल्ड शाम्पूने धुवा. यामुळे टाळू आणि केसांमध्ये मऊपणा टिकून राहते आणि हेअर डॅमेज कमी होतो.

३) इसेंशियल ऑइल यूज करा

हेअर डॅमेज ठीक करण्यासाठी तुम्ही इसेंशियल तेल देखील वापरू शकता. इसेंशियल तेल केवळ त्वचेसाठीच फायदेशीर नसते, तर केसांशी संबंधित समस्याही दूर करतात. इसेंशियल तेलाचा वापर केल्याने केस मऊ, लवचिक आणि सुंदर बनू शकतात. यासाठी तुम्ही पेपरमिंट तेल किंवा लॅव्हेंडर तेल वापरू शकता. पण या तेलामध्ये खोबरेल तेल मिक्स करा. यामुळे कोरड्या आणि निर्जीव केसांपासून सुटका होईल. तसेच केस गळणे आणि तुटणे देखील थांबेल. (Lifestyle)

४) एवोकॅडो आणि एग हेअर मास्क लावा

हेअर डॅमेज दूर करण्यासाठी तुम्ही एवोकॅडो आणि अंड्याचा हेअर मास्क देखील लावू शकता. एवोकॅडो डॅमेज केस दुरुस्त करण्यासाठी खूप प्रभावी आहे. एवढेच नाही तर अंड्यातील प्रोटीन केसांना पोषणही देतात.

एवोकॅडो आणि अंड्याचा हेअर मास्क केसांना पुरेसे प्रोटीन आणि जीवनसत्त्वे पुरवतो. यामुळे खराब झालेले केस दुरुस्त होतात. यासाठी एवोकॅडो आणि अंडी एकत्र करून पेस्ट बनवा. (Hair Care) आता हे केस आणि टाळूला चांगले लावा. अर्ध्या तासानंतर केस माइल़्ड शाम्पूने धुवा. आठवड्यातून 1-2 वेळा एवोकॅडो आणि अंड्याचा हेअर मास्क लावल्याने केस मऊ आणि चमकदार होतील.

५) केस धुतल्यानंतर केस नॅचरली कोरडे करा

जे लोक केस सुकवण्यासाठी ड्रायर वगैरे वापरतात, त्यांच्या केसांना जास्त नुकसान होते. जर तुमचे केस खराब आणि निर्जीव झाले असतील तर तुम्ही तुमचे केस नैसर्गिकरित्या सुकवण्याचा प्रयत्न करावा. केस सुकविण्यासाठी ड्रायर वगैरे वापरणे टाळावे. तसेच हेअर स्ट्रेटनिंग देखील टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT