Multani mitti hair mask esakal
लाइफस्टाइल

Hair Mask :केसांना मुलतानी माती लावण्याचेही ढिगभर फायदे, प्रयोग करून पहा

आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क लावल्याने केसांवर चांगला परिणाम दिसून येतो.

सकाळ डिजिटल टीम

Hair Mask :

मुलतानी मातीचे नाव जेव्हा निघते तेव्हा तिचे त्वचेसाठी असलेले फायदे आपण पाहतो. आयुर्वेदीक काळापासून सुंदर दिसण्यासाठी मुलतानी माती वापरली जात आहे. मुलतानी माती केसांवर लावल्याने ते टाळूवरील अतिरिक्त तेल बाहेर काढते. यामुळे केसांवरील दिसणारा चिकटपणा दूर होतो. (Multani Mati)

केसांची मुळे मजबूत करणे, टाळूवरील रक्ताभिसरण  सुधारणे आणि केसांना कंडिशनिंग देखील मुलतानी माती करते. मुलतानी माती केसांसाठी गुणकारी आहे हे तर आपल्या लक्षात आले. आता मुलतानी माती केसांना लावायची कशी हे पाहुयात. माती तीन प्रकारे केसांना लावू शकतो. केसांसाठी बनवलेले हे पॅक अधिक फायद्याचे ठरतील.

मुलतानी माती आणि लिंबाचा रस

मुलतानी माती लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने कोंडापासून आराम मिळतो. हे डोक्यातील घाणेरडे बॅक्टेरिया काढून टाकते आणि त्यात अँटी-फंगल गुणधर्म देखील असतात. हे डोक्यावरील त्वचेची स्वच्छता करते.

४ चमचे मुलतानी मातीमध्ये २ चमचे लिंबाचा रस मिसळा. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून हा तयार हेअर मास्क अर्धा तास डोक्यावर लावा आणि नंतर धुवा. याने केसांना वेगळीच  चमक येईल.

मुलतानी माती आणि कोरफड

कोरफडीच्या ताज्या पानातून कोरफडीचा गर काढा. एका भांड्यात २ चमचे कोरफडीचा गर घ्या आणि त्यात एक चमचा मुलतानी माती घाला. आवश्यकतेनुसार साहित्यही वाढवता येते. दोन्ही गोष्टी एकत्र करून मास्क तयार करा. (Hair Mask)

हा हेअर मास्क केसांच्या मुळाशी लावा. 35 ते 40 मिनिटे डोक्यावर ठेवा आणि नंतर धुवा. केस मऊ मुलायम होतात.

मुलतानी माती आणि दही

दही आणि मुलतानी माती केसांवर लावल्याने केस हायड्रेट होतात आणि केसांना आर्द्रता देखील मिळते. कोरड्या केसांसाठी हा हेअर मास्क खूप चांगला आहे. हे बनवण्यासाठी २ चमचे मुलतानी मातीमध्ये एक चमचा दही मिसळा. हा हेअर मास्क तुम्ही अर्धा तास केसांवर ठेवू शकता. (Hair Care)

 आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क लावल्याने केसांवर चांगला परिणाम दिसून येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

दारूच्या नशेतच कपूर परिवाराला पहिल्यांदा भेटली संजय कपूरची बायको ; म्हणाली "ड्रिंक्स करताना त्याने प्रपोज केलं"

SCROLL FOR NEXT