hair serum benefits and side effects  esakal
लाइफस्टाइल

Hair Serum : हेअर सिरम केसांसाठी फायद्याचेच हे कोणी ठरवलं? वापरण्याआधी या गोष्टींचा नक्की विचार करा

Hair Serum Benefits And Side Effects :हेअर सिरम हे सिलिकॉन बेस्ट प्रॉडक्ट असल्याने ते आपल्या केसांसाठी कसे उपयुक्त ठरू शकते. असा प्रश्न अनेकांना पडलेला असेल.

सकाळ डिजिटल टीम

Hair Serum :

जेव्हा एखादी स्त्री नकशीखांत नटलेली असते. आणि तिचे केस फक्त विचित्र असतात किंवा विस्कटलेले असतात तर तिच्या सौंदर्याकडे नाही तर तिच्या विस्कटलेल्या केसांकडे जास्त लक्ष जातं.

महिलांना सगळ्याच गोष्टींकडे पुरेपूर लक्ष द्यावे लागत. केसांना चमकदार बनवण्यासाठी आजकल अनेक प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक चर्चेत असणारा नाव आहे हेअर सिरमचं. तुमच्या केसांना शायनिंग देतो आणि सॉफ्ट बनवतो. त्यामुळे अनेक तरुणांच्या हेअर केअर रुटीनमध्ये हेअर सिरमचा समावेश असतो. (Hair Serum Benefits And Side Effects )

केसांना तेल लावणे, मेहंदी लावणे, डाय करणे किंवा काही घरगुती उपाय करणे यामध्ये आता सिरमचे सुद्धा नाव ऍड झाले आहे. केसांना मऊ बनवण्यासाठी पार्लरमध्ये अनेक ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. पण त्यामध्ये मस्त अशा हेअर सिरमचा नक्कीच विचार केला जातो. कारण कमी पैशात जास्त फायदा देणार प्रॉडक्ट म्हणून सिरम कडे पाहिलं जात आहे.

दुसरी बाजू म्हणजे तुम्ही एखादी ट्रीटमेंट केल्यानंतर ती तीन ते सहा महिनेच ती टिकून राहते. त्यानंतर पुन्हा केसांची वाट लागते. त्यांना कायमस्वरूपी शाईन द्यायची असेल तर एक हेल्दी पर्याय म्हणून सिरमचा नक्की विचार केला जातो. पण हे सिरम लावणे आपल्या केसांसाठी योग्य आहे का? याबद्दल फारशा लोकांना माहिती नाही. तेच आज आपण जाणून घेऊयात.

हेअर सिरम काय असत

हेअर सिरम हे सिलिकॉन बेस्ट प्रॉडक्ट आहे. जे सिलिकॉन तेल आणि रबराच एक सिंथेटिक कंपाउंड असते. त्याचा वापर इमारती बनवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रॉडक्टमध्ये केला जातो. त्यामुळे ओलाव्यामुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. केसांच्या अनेक प्रॉडक्टमध्ये याचा अंश असतो. शाम्पू कंडिशनर सारख्या हेअर प्रॉडक्ट मध्ये हे सिरम असते.

हेअर सिरम कसे काम करते

हेअर सिरम हे सिलिकॉन बेस्ट प्रॉडक्ट असल्याने ते आपल्या केसांसाठी कसे उपयुक्त ठरू शकते. असा प्रश्न अनेकांना पडलेला असेल. हे सिरम आपल्या केसांच्या स्ट्रक्चरमध्ये बदल करत नाही आणि ते आपल्या केसांच्या मुळापर्यंत सुद्धा पोहोचत नाही.

ते फक्त आपल्या केसांना वरचेवर एक लेयर बनवते जे आपल्याला हानिकारक धुळीपासून आणि प्रदूषणापासून केसांचे रक्षण करते. हेअर सिरम चा वापर केल्याने केस गळती आणि केसांच्या इतर समस्यांपासून सुद्धा सुटका होऊ शकते.

केसांवर हेअर सिरम लावणे योग्य आहे का?

केसांना लावण्यासाठी बनवल्या जाणाऱ्या हेअर सिरम मध्ये डायमेथिकोन आणि पॉलिसीलोसेन असतं. जे आपल्या केसांना उन्हापासून आणि धुळीपासून वाचवण्यात फायदेशीर ठरतं. ते आपल्या केसांच्या मुळांनाही मजबूत करत बेस्ट हेअर सिरम केसांना एक वेगळी शाईन सुद्धा देतो. पण असं काही नाही की प्रत्येकीने त्याचा वापर केलाच पाहिजे. हे जर ऑलरेडी शायनी आणि नॅचरली सॉफ्ट असतील तर तुम्हाला सिरम लावण्याची गरज नाही.

हेअर सिरम लावण्याचे काय फायदे आहेत?

  • सिरम तुमच्या केसांचे गळणे कमी करते.

  • सिरम तुमच्या केसांना हायड्रेट बनवते.

  • सिरम तुमच्या केसांना चमकदार बनवते.

  • सिरम तुमच्या केसांचा पीएच लेवल सामान्य बनवून ठेवतो.

  • आणि डॅमेज केसांना सुद्धा रिपेअर करण्यात सिरम महत्त्व आहे.

हेअर सिरमचे तोटे काय आहेत

  • हेअर सिरम केसांना लावण्याचा आणि तोटे सुद्धा आहेत.

  • जर तुम्हाला कुठली एलर्जी असेल तर तुम्ही वापरू नका. जर तुमचे केस आणि त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर याचा वापर टाळा.

  • तसेच जर तुम्ही सतत हेअर सिरम चा वापर करत असाल तर केस डॅमेज होऊ शकतात.

  • सतत केसांना लावल्याने केस तुटणे, गळणे केसांना फाटे फुटणे, टाळू मध्ये खाज होणे, अशा असा समस्या निर्माण होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT