Happy New Year 2024 esakal
लाइफस्टाइल

Happy New Year 2024 : काय सांगताय ! कुठ लाल अंडरवेअर घालून,तर कुठं भांडी फोडून साजरे होते नववर्ष

या देशात सफरचंद कापून ओळखलं जातं भविष्य

Pooja Karande-Kadam

Happy New Year 2024 : 

2023 वर्षातील काहीच दिवस आता उरले आहेत. जूनी नाती सोबत धरून आपण नवी नाती जोडतो, अगदी त्याच पद्धतीने जून्या वर्षाच्या आठवणी सोबत घेऊन नव्या वर्षांचे स्वागत लोक करतात.  नवीन वर्ष जगभर साजरे केले जात आहे आणि लोक आपल्या नातेवाईकांसोबत साजरे करत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की जगाच्या कानाकोपऱ्यात नवीन वर्ष साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.

भारतातील लोक नव्या वर्षांच्या स्वागताला एखादी ट्रिप काढतात. किंवा त्या रात्री बाहेर जेवणाचे नियोजन करतात. काही लोक घरीच चमचमीत बेत करतात अन् कुटुंबासोबत वेळ घालवतात. पण परदेशातील लोक मात्र बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती या दिवशी पाळल्या जातात.

इटलीत लोक रेड अंडरवेअर घालतात

इटलीत अनेक वर्षांपासून ह प्रथा पाळली जाते. येथे, नवीन वर्ष सुरू होताच पहिल्या दिवशी स्त्री,पुरूष दोघेही लाल अंडरवेअर घालतात. पण ते असं करण्यामागे खास कारण आहे. कोणताही रोमॅन्टीक फिल यावा म्हणून नव्हे. तर, ज्या जोडप्यांना मुलं नाहीत, ज्यांना मुलांची आस आहे, त्यांनी असे केल्याने येणाऱ्या काळात तरी त्यांची कुस उजवली जाते, असे म्हटले जाते.

बर्फाळ सरोवरात झाड लावणे

रशियातील हा विश्वास 25 वर्षांहून अधिक जुना आहे. गोठलेल्या बैकल सरोवरात नवीन वर्षाचे झाड लावण्यासाठी खोलवर पृष्ठभागाच्या सुमारे 100 फूट खाली जातात. झाडाला शुभ मानले जाते.

स्मशानभूमी स्वच्छता मोहीम

चिलीमध्ये  नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लोक त्यांच्या पूर्वजांना आणि ज्यांचे निधन झाले आहे त्यांचे स्मरण करतात आणि स्मशानभूमीत जाऊन ती स्वच्छ करतात. अशा पद्धतीने २०२३ किंवा त्याआधी सोडून गेलेल्या लोकांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला जातो.  

प्लेट फोडून नववर्षाचे स्वागत

डेन्मार्कमध्ये लोक काचेच्या प्लेट फोडतात. ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता काही लोक एकमेकांच्या घरी जमतात. पार्टीचे आयोजन करतात अन् घरी असलेल्या प्लेट फोडल्या जातात. यामागे असे म्हटले जाते की, येत्या वर्षात ते रागावर नियंत्रण मिळवतील, त्यामुळे जो काही राग आहे तो प्लेट फोडून दाखवला जातो. 

ग्रीसचे लोक आणि कांदे

नवीन वर्षाच्या नवीन सुरुवातीसाठी, ग्रीसचे लोक त्यांच्या घराबाहेर कांद्यांच्या माळा लटकवतात. नववर्षाच्या पहिल्या दिवसाची सकाळ उजाडताच पालक आपल्या मुलांना हळूच डोक्यावर कांदे मारून उठवतात. यामुळे घरात आणि मुलांच्या जीवनात आनंद येतो, अशी मान्यता आहे.  

सफरचंदाचे भविष्य

झेकमध्ये लोक टॅरो कार्डच्या ऐवजी सफरचंदांच्या आधारे भविष्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. सफरचंद कापून आत तारा दिसला तर येणारे वर्ष लोकांसाठी चांगले असेल. पण आत क्रॉस तयार झाला तर घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते.

स्पेन, द्राक्ष खा समृद्धी येईल

स्पेनमध्ये नवीन वर्ष अगदी वेगळ्या पद्धतीने साजरे केले जाते. येथे लोक प्रथम 12 वाजता द्राक्षे खातात. पण त्याची संख्या 12 असावी. ही समजूत १९व्या शतकापासून चालत आलेली आहे आणि त्यामागील कारण म्हणजे द्राक्षांमुळे लोकांची समृद्धी होते. 12 वाजल्याबरोबर द्राक्षं खाल्ली जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT