आपल्या आई-वडिलांनंतर कोणी गुरु असेल तर ते आपले शिक्षक असतात. आपल्या जीवनातील पंधरा-सोळा वर्ष आपण शिक्षणासाठी खर्च करतो. या वर्षात आपल्या आई-वडिलांना व्यतिरिक्त शिक्षकांकडून आपल्याला मार्गदर्शन मिळते. त्या शिक्षकांचा हा दिवस म्हणजे शिक्षक दिन.
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस 5 सप्टेंबरला भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी देशभरातील विविध राज्यातील शिक्षकांना राष्ट्रपतींकडून आदर्श शिक्षक असा पुरस्कारही मिळतो. अशा या महत्त्वाची भूमिका पार पाडण्याचे शिक्षकांना तुम्ही काही शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस खास बनवू शकता. (Teachers Day 2024)
काळ्या रंगाच्या फळ्यावर पांढऱ्या खडूने लिहून
अनेकांचे भविष्य उज्वल करणाऱ्या गुरूजनांना
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
चांगला शिक्षक तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देत नाही
तर तो तुम्हाला उत्तरं शोधायची नजर देतो
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
गुरू ब्रह्मा, गुरू विष्णू, गुरू देवो महेश्वरा!
गुरू साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरूवे नम:
लाडक्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
वाट दाखवणारा चुकला की वाटही चुकते,
त्यामुळेच आपल्या जीवनात गुरूंना महत्त्व आहे
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अडाणी,अशिक्षित लोकांकडे पाहून समजतं की,
शिक्षक आपल्याला इतके पोटतिडकीने का शिकवायचे
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे.
तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही,
फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन
जगणंही शिकवता तुम्ही.
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
जन्मदात्यांपेक्षा जास्त महत्त्व आहे
शिक्षकांना कारण ज्ञान व्यक्तीला माणूस
बनवतं. जे योग्य जीवन जगण्यासाठी
आवश्यक आहे. सर्व शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
देवाकडे तुम्हाला आमचे शिक्षक केल्याबद्दल
खूप खूप आभार.
तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
आशिर्वादापेक्षा कमी नाही.
माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही माझ्या जगण्याची प्रेरणा आहात
तुम्हीच माझे गाईड आहात.
माझ्या जीवनातील प्रकाश स्तंभ आहात.
मनापासून तुम्हाला धन्यवाद.
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.