Benefits of Green Coriander esakal
लाइफस्टाइल

Benefits of Green Coriander : डोळ्यांसाठी फायदेशीर आहे कोथिंबीर, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

कोथिंबीर आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते.

सकाळ डिजिटल टीम

स्वयंपाक घरात शिजणाऱ्या प्रत्येक खाद्यपदार्थाला चव वाढवणारी कोथिंबीर अनेकांच्या आवडीची आहे. कोथिंबीर ही वाटणासाठी, खाद्यपदार्थांवर गार्निशिंग (सजावटीसाठी) करण्यासाठी आवर्जून वापरली जाते. भाज्यांच्या वाटणामध्ये कोथिंबीर महत्वाची भूमिका बजावते. हिरवीगार कोथिंबीर आपल्या जेवणाचा आस्वाद वाढवते, यात काही शंका नाही.

परंतु, कोथिंबीर फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर, अनेक आजारांमध्ये कोथिंबीरचा आहारात समावेश असणे हे फार महत्वाचे आहे. कोथिंबीर आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. आज आपण कोथिंबीरचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

कोथिंबीरचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे

डोळ्यांसाठी फायदेशीर

हिरव्या कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमध्ये व्हिटॅमिन A चे प्रमाण भरपूर असते. हे व्हिटॅमिन A डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे, तुमच्या रोजच्या आहारामध्ये कोथिंबीरचा समावेश जरूर करा. ज्यामुळे, डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळू शकेल.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

कोथिंबीरमध्ये पोषकघटकांचे प्रमाण भरपूर असते. हे पोषकघटक आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. या पोषकघटकांमध्ये व्हिटॅमिन C चा ही समावेश आहे. कोणत्याही जंतू संसर्गापासून आपल्या शरिराला दूर ठेवण्याचे काम व्हिटॅमिन C  करते. त्यामुळे, आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास कोथिंबीर लाभदायी ठरते.

किडनीच्या विकारांमध्ये लाभदायी

कोथिंबीर ही किडनीच्या विकारांमध्ये देखील लाभदायी ठरते. अनेक संशोधनांमधून हे समोर आले आहे की, कोथिंबीर आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी लाभदायी आहे. कोथिंबीरमध्ये असलेल्या पोषणतत्वांमुळे किडनीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे, ज्यांना किडनीचे आजार आहेत, अशा लोकांनी त्यांच्या आहारात कोथिंबीरचा समावेश जरूर करावा.

मधुमेहासाठी सहाय्यक ठरते

रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी कोथिंबीर हा रामबाण उपाय आहे. मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांच्या आहारात कोथिंबीरचा समावेश जरूर करावा. कोथिंबीरचे नियमित सेवन केल्यामुळे रक्तातील इन्सुलिनच्या पातळीला कंट्रोल केले जाऊ शकते.

पचनक्षमता सुधारते

पोटाच्या विविध समस्या दूर करण्यासाठी कोथिंबीर फायदेशीर ठरते. तसेच, पचनक्षमता सुधारण्यात कोथिंबीर महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे, नियमितपणे कोथिंबीरचा आहारात समावेश केल्याने पचनक्षमता सुधारते. अपचन, गॅसेसची समस्या दूर करण्यासाठी कोथिंबीर मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख हल्ला प्रकरणाचं AI रिक्रिएशन; विशेष पोलिस महानिरिक्षकांची माहिती

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT