Tofu Benefits esakal
लाइफस्टाइल

Tofu Benefits : टोफू आहे सर्वोत्तम सुपरफूड, 'या' कारणांसाठी आहारात जरूर करा समावेश

Tofu Benefits : पनीर हे दुधापासून बनवले जाते तर टोफू हे सोयापासून बनवले जाते.

Monika Lonkar –Kumbhar

लTofu Benefits : पनीर आणि टोफूमध्ये पोषकतत्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. परंतु, अनेकदा लोक पनीर आणि टोफूला एकच समजतात. प्रत्यक्षात पनीर हे दुधापासून बनवले जाते तर टोफू हे सोयापासून बनवले जाते.

पनीर आणि टोफू दिसायला जरी सारखे दिसत असले तरी त्याची चव ही वेगळी असते. पनीरमध्ये कॅल्शिअम अन् जीवनसत्वे विपुल प्रमाणात असतात तर टोफूमध्ये व्हिटॅमीन बी १ आणि अ‍ॅमिनो अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात आढळते.

आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या टोफूचा आहारात समावेश केल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. शाकाहारी लोकांच्या आरोग्यासाठी हा तर एक अतिशय उत्तम पर्याय आहे.

जर तुम्ही योग्य मसाले आणि सॉस वापरले तर तुम्ही टोफूपासून अनेक चवदार आणि पौष्टिक खाद्यपदार्थ बनवू शकता. टोफू हे सुपरफूड का आहे? आणि त्याचा आहारात समावेश केल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात? चला तर मग जाणून घेऊयात.

मांसपेशींसाठी लाभदायी

टोफू हे एक संपूर्ण प्रथिने आहे. टोफूमध्ये अ‍ॅमिनो अ‍ॅसिड्स असतात, ज्यामुळे शरीराला काम करण्यासाठी भरपूर ऊर्जा मिळते. तसेच, शरीरातील स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि विकासासाठी टोफू फायदेशीर ठरते. त्यामुळे, आपल्या शरीरातील स्नायूंच्या मजबूतीसाठी टोफू लाभदायी आहे.

कर्करोगाचा धोका कमी होतो

ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि टोफूचे सेवन केल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होते. असे अनेक संधोधनांमधून समोर आले आहे. कर्करोगासाठी आणि इतर आजारांना दूर करण्यासाठी फायदेशीर असणाऱ्या टोफूचा आहारात जरूर समावेश करा.

पोषकतत्वांचे विपुल प्रमाण

टोफूमध्ये मॅंगनीज, फॉस्फरस आणि लोहाचे भरपूर प्रमाण आढळते. यासोबतच कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत म्हणून ही टोफूला ओळखले जाते. या सर्व पोषकतत्वांमुळे टोफू आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. टोफूचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील हाडे आणि दात मजबूत होतात. यामुळे, शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि काम करण्यास उत्साह येतो.

हृदयासाठी फायदेशीर

टोफूमध्ये फ्लेव्होनॉइड्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. ज्यामुळे, उच्च रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच, हृदयाशी संबंधित इतर आजारांपासून बचाव होतो, असे ही काही संशोधनांमधून समोर आले आहे.

तसेच, टोफूमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे विपुल प्रमाण असते. ज्यामुळे, आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यामुळे, ज्या लोकांना हृदयविकाराची समस्या आहे, अशा लोकांनी त्यांच्या डॉक्टरांना विचारून आहारात टोफूचा जरूर समावेश करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाप'माणूस! सरकारी रुग्णालयातील अग्निकांडात याकूबने परक्यांच्या बाळांना वाचवले, मात्र आपल्या जुळ्या मुली गमावल्या...

'Rishabh Pant ला हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हा वाटलं परत क्रिकेट...', रवी शास्त्रींनी सांगितली आठवण

Satara Crime : घरात जेवण बनविण्याच्या वादातून पतीने केला पत्नीचा खून; लाथाबुक्क्या, लाकडी काठीने बेदम मारहाण

'या' तारखेला सामांथाचा पूर्वाश्रमीचा नवरा अडकणार पुन्हा लग्नबंधनात ; पत्रिकेचा फोटो झाला व्हायरल

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : निवडणूक प्रचाराकडे रोजंदारी मजुरांनी फिरवली पाठ

SCROLL FOR NEXT