लाइफस्टाइल

Health Care News : बदलत्या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

Aishwarya Musale

बदलत्या हवामानात आजारांचा धोका जास्त असतो. विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यांना जास्त धोका असतो. आजारपण टाळण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी, मजबूत प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असेल तर तुम्ही अनेक रोग आणि संक्रमणांपासून सुरक्षित राहू शकता. यावेळी हवामान बदलत आहे.

थंडी संपत असून हळूहळू उन्हाळा सुरू होईल. अशा स्थितीत मौसमी आजारांपासून दूर राहण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे. तज्ज्ञांच्या सूचनेनुसार तुमच्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश केल्यास तुम्ही हंगामी आजार टाळू शकता.

लिंबूवर्गीय फळे

बदलत्या ऋतूंमध्ये प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपल्या आहारात लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. व्हिटॅमिन सी रक्तातील पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढवते. तुमच्या आहारात संत्री, द्राक्षे, मोसंबी, टेंजेरिन आणि लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा.

आले आणि लसूण

आले आणि लसूण जवळजवळ सर्व भारतीय घरांमध्ये वापरले जाते. आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आढळतात. त्याच वेळी, लसणात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म देखील असतात. या दोन्ही गोष्टी शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवतात.

ब्रोकोली

ब्रोकोली आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. याशिवाय ब्रोकोलीमध्ये भरपूर फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. या सर्व गोष्टींचा आरोग्याला फायदा होतो.

ड्रायफ्रूट्स

ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी खूप चांगले असते. यामध्ये झिंक आणि इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे बदलत्या ऋतूंमध्ये त्यांचा आहारात समावेश करा. भिजवलेले बदाम, अक्रोड, काजू आणि बेदाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तसेच, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया आणि चिया सीड्स खा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif: “हा राजा का भिकारी…”; हसन मुश्रीफांची समरजितसिंह घाटगेंवर बेताल टीका

Durga Pandal Bangladesh: बांगलादेशमध्ये 35 दुर्गा पूजा मंडपांवर हिंसक हल्ले; पेट्रोल बॉम्बही फेकले

Dussehra Fashion: दसऱ्याला 'अशा' पद्धतीने करा तयारी, दिसाल सुंदर

Amravati News : माजी खासदार नवनीत राणा यांना धमकी; पत्रातून केली दहा कोटींच्या खंडणीची मागणी

Dussehra Melava 2024 Live Updates: दसऱ्यानिमित्त दिल्लीत रावणाचा सर्वात मोठा पुतळा

SCROLL FOR NEXT