लाइफस्टाइल

Health Care News: तुम्हीही ब्लॅक टीमध्ये लिंबू टाकून पिता का? किडनीचं होऊ शकतं मोठं नुकसान

तुम्ही देखील Black Tea मध्ये लिंबू पिळून पिता का? किडनीला होवू शकतं नुकसान

Aishwarya Musale

भारतात चहा पिण्याऱ्यांची कमतरता नाही. पाण्यानंतर सगळ्यात जास्त सेवन केलं जाणारं पेय म्हणजे चहा आहे. बरेच लोक दिवसातून अनेक कप चहा पितात. देशात चहा पिणाऱ्याची संख्या मोठी आहे. मग तो दुधाचा चहा असो किंवा ग्रीन टी, ब्लॅक टी Black Tea तुलसी टी विविध प्रकारच्या चहाचं सेवन आपल्या देशात केलं जातं.

खास करून ब्लॅक टी. चहा हा आरोग्यासाठी घातक आहे हे ठाऊक असूनही दिवसातून एक कप तरी चहाचं सेवन केलंच जातं. दूध आणि साखरेचा चहा तर आरोग्यासाठी अधिकच घातक आहे.

यामुळे मधुमेह Diabetes आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येसोबतच इतरही अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. यालाच पर्याय म्हणून गेल्या काही वर्षामध्ये अनेकांनी आपला मोर्चा ब्लॅक टी म्हणजेच काळ्या चहाकडे वळला आहे.

खासकरून पित्त होवू नये, रिफ्रेश वाटावं किंवा वजन कमी करण्यासाठी अशा विविध उद्देशाने अनेकजण ब्लॅक टीमध्ये लिंबाचा रस टाकून सेवन करतात. मात्र, अनेकांना आरोग्यासाठी चांगली वाटणाऱ्या या लेमन टीमुळे देखील तुम्हाला किडनीच्या समस्यांसोबतच इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होवू शकतात.

काळा चहा आणि लिंबू

गेल्या काही वर्षात अनेकांना दुधाच्या चहाचे आरोग्यासाठी दुष्परिणाम असल्याचं कळताच ब्लॅक टीचं सेवन करण्यास सुरूवात केली.

व्हिटॅमिन सी हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासोबत, हाडं मजबूत होण्यास, त्वचा आणि केसांसाठी ते लाभदायक आहे. मात्र काळ्या चहासोबत लिंबाचं सेवन केल्यास किडनीच्या समस्या निर्माण होवू शकता. यामुळे मूतखडा होण्याची दाट शक्यता असते तसंच किडनीच्या कार्यप्रणालीवर परिणाम होवू शकतो.

अभ्यासातून असं समोर आलं आहे की जे लोक गरजेपेक्षा जास्त लिंबू टाकलेल्या ब्लॅक टीचं सेवन करतात त्यांच्यात कॅरेटिनिनची Creatinine) पातळी वाढू शकते. साधारणपणे ही पातळी १ हून कमी असणं गरजेचं असतं.

Vitamin C चे दुष्परिणाम

शरीरासाठी व्हिटॅमिन सी हे गरजेचं असलं तरी गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी चं सेवन केल्यास शरीरामध्ये ऑक्सिलेटचं प्रमाण वाढू शकतं. परिणामी यामुळे किडनी इंफेक्शन किंवा किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो.

तज्ञांच्या मते कोणत्याही गोष्टीचं अतिसेवन हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. यामुळेच आरोग्याची काळजी घेत असताना कोणत्याही गोष्टीचं अतिसेवन टाळावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT