Healthy Diet sakal
लाइफस्टाइल

Healthy Diet: वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये करू नका या चुका, नाहीतर...

नाश्ता केवळ वजन घटवण्यासाठीच नव्हे तर अन्य कारणांसाठी दिवसभराचे महत्त्वपूर्ण अन्न मानले जाते.

Aishwarya Musale

खराब जीवनशैलीमुळे आपले वजन वाढू लागते. यासाठी आपण अनेकदा वजन कमी करण्याचा विचार करतो आणि व्यायामासह आहारात विविध बदल करत राहतो. व्यायाम बाजूला ठेऊन, वजन कमी करण्यात आहाराची भूमिका खूप महत्त्वाची असते आणि त्याची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे असते.

वाढते वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या दिवसाच्या पहिल्या डाइटमध्ये म्हणजे नाश्त्यामध्ये काही लहान-मोठ्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करताना नाश्त्यामध्ये केलेल्या काही चुका सांगणार आहोत ज्या तुम्ही चुकूनही करू नयेत जेणेकरून तुमचे वजन झपाट्याने कमी होईल.

नाश्त्यात कोणते पदार्थ खावेत?

नाश्ता हेवी असावा अनेकदा म्हटले जाते, पण याचा अर्थ तेलकट पदार्थ खावेत असा अजिबात नाही. आम्ही असे म्हणत आहोत कारण अनेकदा आपण नाश्त्यात पराठे, आलू-पुरी, कचोरी असे अनेक हेवी पदार्थ खातो. आम्ही तुम्हाला सांगतो की या सर्व गोष्टींमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप जास्त आहे, ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.

या सर्व गोष्टींऐवजी प्रथिनयुक्त पदार्थ सकाळच्या नाश्त्यात खावेत. प्रथिने समृद्ध असलेल्या गोष्टींबद्दल बोलायचे तर, यासाठी तुम्ही दही, अंडी यासारख्या गोष्टींचे सेवन करू शकता. यासाठी तुम्ही नाश्त्यात अनेक भाज्यांचाही समावेश करू शकता.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही नाश्त्यासोबत कोणते ड्रिंक्स प्यावे?

आपल्यापैकी बहुतेकांना नाश्त्यात चहा किंवा कॉफी प्यायला आवडते. आम्ही तुम्हाला सांगतो की चहाचे सेवन केल्याने तुमचे वजन अजिबात कमी होणार नाही, उलट ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. न्याहारीसाठी, या सर्वांऐवजी, तुम्ही तुमच्या आहारात आरोग्यदायी घटकांपासून बनवलेल्या पेयांचा समावेश करा.

यासाठी तुम्ही साखरेशिवाय ताक, लिंबू पाणी किंवा कोणत्याही आरोग्यदायी फळांचा ज्यूस पिऊ शकता. या सर्व गोष्टींचे सेवन केल्याने तुम्हाला चवीसोबतच तुमच्या शरीरात ऊर्जा जाणवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT