लाइफस्टाइल

Health Care News : महिलांनी रोज करावी ‘ही’ योगासने, PCOD आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून मिळेल आराम

PCOD आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून मिळेल आराम, ही योगासने नक्की करून बघा

Aishwarya Musale

मासिक पाळीदरम्यान (Period) पोटात दुखणे सामान्य आहे. महिलांना मासिक पाळीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही महिलांसाठी हे दिवस खूप वेदनादायक असू शकतात. त्याच वेळी, काही महिलांना या दिवसांमध्ये फारशी समस्या येत नाही.

मासिक पाळीच्या आधीही, हार्मोनल चढउतारांमुळे, शरीर दुखणे, सूज येणे, चिडचिड होणे आणि मूड स्विंग्स यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याला PMS म्हणतात. तज्ज्ञांनी सुचवलेली 2 योगासने मासिक पाळीच्या दिवसात पीएमएसची अस्वस्थता आणि लक्षणे कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. हे करण्याचे योग्य मार्ग आणि फायदे जाणून घ्या.

पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी बालासन

  • योगा मॅटवर गुडघ्याच्या सहाय्यावर बसा.

  • दोन्ही पायाची तळवे आणि टाचांना एकत्रित आणा

  • हळूहळू आपले गुडघे शक्य तितके पसरवा.

  • दीर्घ श्वास घ्या आणि पुढे झुका.

  • दोन्ही मांड्यांमध्ये पोट घ्या आणि श्वास सोडा.

  • कंबरेच्या मागच्या बाजूच्या भागात त्रिकास्थि (Sacrum)ला रुंद करा.

  • आहे त्या स्थितीत स्थिर राहा.

  • मानेच्या मागे डोके किंचित उचलण्याचा प्रयत्न करा.

  • टेलबोनला पेल्विसकडे खेचण्याचा प्रयत्न करा.

  • हात समोर आणा आणि आपल्या समोर ठेवा.

  • दोन्ही हात गुडघ्यांच्या रेषेत राहतील.

  • दोन्ही खांदे जमीनीला स्पर्श करतील यासाठी प्रयत्न करा.

  • 30 सेकंद ते काही मिनिटे या स्थितीत रहा.

  • हळूहळू हात पुढे ताणत श्वास घ्या.

मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी सेतुबंधासन

  • सर्वात प्रथम पाठीवर झोपा आणि दोन्ही हात शरीराजवळ ठेवा.

  • यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून कमरेचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करावा.

  • हे करताना दोन्ही हात जमिनीवरच रहावेत.

  • कमरेचा भाग जितका शक्य होईल तितकाच वर उचलावा.

  • या स्थितीत काही सेकंदं थांबल्यानंतर पुन्हा पहिल्या स्थितीत यावे.

  • पाठिला दुखापत झाल्यास हे आसन करणं टाळावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : शिवसेना शिंदे गटाची जाहिरात, उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

गोफण | बॅगा तपासल्या अन् पैसे हरवले

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

SCROLL FOR NEXT