लाइफस्टाइल

Sugar Craving : शुगर क्रेविंग कमी करायचंय? मग 'या' पदार्थांचा करा रोजच्या आहारात समावेश

जर तुम्हाला शुगर क्रेविंग्स जास्त होत असेल तर ते आरोग्यासाठी चांगले नाही आणि त्यामागे अनेक कारणे असू शकतात.

Aishwarya Musale

शुगर क्रेविंग म्हणजे सतत गोड खाण्याची इच्छा. अनेक जणांना सतत गोड खाण्याची इच्छा होते आणि म्हणूनच ते स्वतःला मिठाई खाण्यापासून रोखू शकत नाही. आपल्या देशात सण असो किंवा कोणताही विशेष प्रसंग, मिठाई खाल्ल्याशिवाय ते अपूर्ण मानले जाते. अधूनमधून गोड खाण्याची इच्छा होणे आणि मिठाई खाणे ही वेगळी गोष्ट आहे, परंतु जर तुम्हाला शुगर क्रेविंग्स जास्त होत असेल तर ते आरोग्यासाठी चांगले नाही आणि त्यामागे अनेक कारणे असू शकतात.

जास्त साखर खाल्ल्याने आपल्या आतड्यांच्या आरोग्यावर आणि हार्मोन्सवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आतड्यांमध्ये वाईट बॅक्टेरिया वाढतात आणि अनेक आजार होण्याचा धोका असतो. चला तर मग जाणून घेऊया कोणते खाद्यपदार्थ शुगर क्रेविंग्स कमी करू शकतात.

केळी

शुगर क्रेविंगची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही केळी खाऊ शकता. केळीमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि मॅग्नेशियमसारखे अनेक पोषक घटक असतात. साखरेमध्ये आढळणाऱ्या फ्रक्टोजची पातळी म्हणजेच फळांमध्ये आढळणारी साखर खूप कमी असते. हे रक्तातील साखर आणि डोपामाइनची पातळी नियंत्रित करते. केळी गोड असते पण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो.

भोपळ्याच्या बिया

वजन कमी करण्यासाठी आणि महिलांच्या आरोग्यासाठी भोपळ्याच्या बिया खूप चांगल्या असतात. यामध्ये झिंक मुबलक प्रमाणात आढळते. हे इन्सुलिन आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते. दिवसभर अशक्तपणा वाटत असेल तर भोपळ्याच्या बिया खाव्यात.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये भरपूर पोषक असतात. हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील चांगले आहे. ब्रोकोली क्रोमियमचा एक चांगला स्त्रोत आहे. तुमच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश जरूर करा.

तूप आणि गूळ

शुगर क्रेविंग कमी करण्यासाठी तुम्ही तूप आणि गूळही खाऊ शकता. लोक वजन कमी करण्यासाठी तूप खाणे बंद करतात, परंतु प्रत्यक्षात तूप हे एक सुपर फूड आहे. या दोन्ही गोष्टी पचनसंस्था स्वच्छ करतात आणि रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati assembly news: बारामतीत खळबळ! श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री सर्च ऑपरेशन, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

थोडक्यात वाचला! फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह अन् अम्पायरचा चेहरा...; भारतीय संघ सराव करतोय त्या 'पर्थ' येथे घडला प्रकार

Latest Marathi News Updates : उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन घेणार दर्शन

Ramesh Kadam: शरद पवार गटाच्या नेत्याच्या अपहरणाचा प्रयत्न, म्हणाले-बाबा सिद्दिकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव

'पाथेर पांचाली' मधील दुर्गा कालवश ; ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांच्या निधनाने बंगाली सिनेविश्वाला धक्का

SCROLL FOR NEXT