Health Care News
Health Care News sakal
लाइफस्टाइल

Health Care News: शरीरातील सूज कमी करण्यासाठी या पदार्थांचा आहारात करा समावेश...

Aishwarya Musale

हात-पायांवर सूज येणे ही सामान्य समस्या आहे. ही कोणालाही होऊ शकते. मात्र, तुमच्या हात, पाय किंवा शरीरावर सतत जर सूज येत असली तर ते चांगले नाही. ही काही आजाराची लक्षणे देखील असू शकतात.

शरीरातील ही सूज दूर करण्यासाठी काही सामान्य घरगुती उपायांचा अवलंब केला जातो. तुम्हालाही ही समस्या टाळायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करू शकता.

बीटरूट

सूज कमी करण्यासाठी तुम्ही बीटरूटचे सेवन करू शकता. तज्ज्ञांच्या मते, बीटरूटमध्ये बीटालेन्स नावाचे अँटीऑक्सिडेंट असते. त्यात नायट्रेट देखील असते, या दोघांचे मिश्रण संधिवात सारख्या दाहक परिस्थितीत फायदेशीर ठरू शकते. हे शरीर डिटॉक्स करण्यासाठी देखील ओळखले जाते.

पालक

पालकचेही सेवन करू शकता. पालकमध्ये झेक्सॅन्थिन आणि ल्युटीन हे दोन शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतात जे जळजळ कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे डोळ्यांची सूज कमी होण्यास मदत होते. हे हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करण्यात मदत करू शकतात.

लसूण 

लसणामध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून आपल्या शरीराच्या संरक्षणात्मक यंत्रणेस समर्थन देतात. यामुळे अल्झायमर रोगासारख्या समस्यांचा धोका कमी होतो.

लवंग

लवंगमध्ये युजेनॉल नावाचे कंपाउंड असते जे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आढळतात जे सूजपासून आराम देतात.

आवळा

आवळा गॅलिक अॅसिड, एस्कॉर्बिक अॅसिड आणि फेनोलिक कंपाऊंड्स सारख्या अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे, ज्यामुळे ते जळजळ कमी करते आणि जुनाट आजारांचा धोका देखील कमी करते. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET-UG Counselling: नीट-यूजी प्रकरणात मोठी अपडेट; पुढील नोटिसीपर्यंत काऊन्सलिंग स्थगित

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? मोठी अपडेट आली समोर

Lek Ladaki Yojana : ‘दादा लाडका दाजीले बी काहीतरी द्या’; ‘लाडकी बहिण’ वरून सोशल मीडियात रंजक रिल्स

Maharashtra Live News Updates : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपीला लवकरच न्यायालयात हजर करणार

Veg Thali Price: सर्वसामान्यांना महागाईचा फटका; शाकाहारी थाळीच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT