लाइफस्टाइल

Guava Leaf Chatani : केवळ टेस्टी नाही तर हेल्दीही आहे पेरूच्या पानांची चटणी; 'या' आजारांवर आहे प्रभावी

केवळ टेस्टी नाही तर हेल्दीही आहे पेरूच्या पानांची चटणी..

Aishwarya Musale

पेरू फक्त खायलाच रुचकर नाही, तर त्यात अनेक पोषकतत्त्वे असतात, ज्यामुळे ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पेरू जितके आरोग्यदायी फायदे आहेत, तितकेच पेरूच्या पानांमध्येही अनेक फायदे आहेत.

तुम्हाला माहीत आहे का? पेरूच्या पानांपासून चहा आणि चटणीही बनवता येते. पेरूच्या पानांची चटणी केवळ तुमच्या जेवणाचीच चव वाढवते असे नाही तर यामुळे तुमच्या आरोग्यालाही अनेक फायदे होतात.

पेरूच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर उपलब्ध आहे. पेरूच्या पानांच्या चटणीचे फायदे जाणून घेऊया.

रक्तातील साखरेचे नियंत्रण

पेरूची पानं आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. त्यामुळे पेरूची चटणी मधुमेहींसाठी खूप फायदेशीर आहे. नियमित याचे सेवन केल्यास खूप फायदा होतो. तसेच पेरूच्या पानांचा चहा देखील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे.

हृदयासाठी चांगले

पेरूच्या पानांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे विषारी पदार्थ नष्ट करतात. पेरूमधील पोटॅशियम आणि विरघळणारे फायबर हृदयाचे रक्षण करते, तसेच खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकार होऊ शकतो. त्यामुळे पेरूच्या पानांची चटणी खा.

मासिक पाळीच्या वेदना

अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान पोटदुखीचा त्रास होतो. चटणीबरोबर पेरूच्या पानांचा रसही या वेदनांवर नियंत्रण ठेवू शकतो. या रसाचे रोज सेवन केल्यास फायदा होतो.

पचनासाठी उत्तम

पेरू पचनक्रिया नियंत्रित करतात. तसेच यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. पेरूच्या पानांचा रस पचनक्रिया सुधारतो.

वजन कमी करण्यास उपयुक्त

पेरूच्या पानांची चटणी खाल्ल्याने कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

तणाव कमी होतो

तणाव कमी करण्यासाठी पेरूचा चहा देखील सेवन केला जाऊ शकतो. तुम्हाला दिवसभर तणाव किंवा थकवा वाटत असेल, डोकेदुखी असेल आणि काय करावे हे कळत नसेल, तेव्हा पेरूचा हर्बल चहा पिण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुम्हाला तणावातून आराम मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sada Sarvankar: "बाळासाहेब असते तर..."; अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन सरवणकर नाराज; ट्विट करत व्यक्त केल्या भावना

Pune Gun Fire: पुण्यात तिघांनी केला गोळीबार; डीपी रोडवरील घटना

Gautam Gambhir cheating case : गौतम गंभीर अडचणीत ! दिल्ली कोर्टाने दिले तपासाचे आदेश, जाणून घ्या 'चिटींग' प्रकरण

Amit Shah: ''अमित शाहांचे अधिकाऱ्यांना हिंसाचाराचे आदेश'' कॅनडाच्या परराष्ट्र उपमंत्र्याचा गंभीर आरोप

त्यांना अटकेची भीती... अजित पवारांच्या भाजपसोबत युतीबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा, सगळचं सांगितलं!

SCROLL FOR NEXT