Health Care News Esakal
लाइफस्टाइल

Health Care News: फक्त दारूच नाही तर 'या' गोष्टींनीही तुमचं लिव्हर होऊ शकतं खराब!

Aishwarya Musale

लिव्हर शरीरात 500 हून अधिक कार्ये करते. आपण सर्वांनी ऐकलंय, वाचलंय की मद्यपान हे लिव्हरच्या आरोग्यासाठी उत्तम नाही. पण तुम्हाला माहिती आहे का दारू न पिणाऱ्या लोकांचंही लिव्हर खराब होऊ शकतं? हो हे खरंय. फक्त मद्यपानच नाही तर इतर असे अनेक कारणे आहेत ज्यामुळे तुमचं लिव्हर डॅमेज होऊ शकतं.

लिव्हरमध्ये एक आजार आहे, फॅटी लिव्हर डिजीज, म्हणजेच लिव्हरवर खराब चरबी जमा होऊ लागते. सामान्यत: लोकांना असे वाटते की जे जास्त मद्यपान करतात त्यांनाच फॅटी लिव्हर रोग होतो. पण ते तसे नाही.

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजार मद्यपान न करता चुकीच्या लाईफस्टाईलमुळे होऊ शकतो. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजाराचे मुख्य लक्षण हे लठ्ठपणा, इंसुलिन रेजिस्टेंस ज्यामध्ये आपल्या शरीराचे सेल्स हॉर्मोन इंसुलिनच्या तुलनेत शुगर बनवत नाही.

हाय ब्लड शुगर लेवल आणि रक्तात फॅटची हाय लेवल, ट्रांस फॅट मागील एक दशकापासून म्हणजेच 10-15 वर्षात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर आजार वाढत आहे. सुरवातीला हे आजार पश्चिमी देशांमध्ये जास्त दिसायचे मात्र आता लोकांच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आता हे भारतातील टॉप आजारांमध्ये गणले जाते.

जर तुमचे जास्त वजन असेल तर तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता जास्त आहे. जसा जसा लठ्ठपणा वाढतो, तसं लिव्हरमध्ये फॅट वाढू लागतं. काही लोक लठ्ठ नसतात तरीसुद्धा त्यांना या आजाराचा सामना करावा लागतोय ज्याला लीन फॅटी लिव्हर आजार म्हणतात.

हा एक मेटाबॉलिक फॅक्टर आहे जो कोलेस्ट्रॉल, हायपरटेंशन आणि ट्रायग्लिसराइड्समुळे होतो. या शिवाय डायबिटीजमुळेही हा आजार होऊ शकतो. जर तुम्ही अॅक्टीव्ह नसाल तर तुमच्या बीएमआय कडे लक्ष देणे, गरजेचे आहे.

'नॉन-अल्कोहोलिक फॅटीलिव्हर आजार होण्यामागील कारण हे लठ्ठपणा आणि डायबिटीजवर कंट्रोल नसणे होय. याशिवाय खूप जास्त कार्बोहाइड्रेटचे सेवन, चुकीचा आहार, जंक फूड, यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.

याशिवाय दररोज व्यायम न करणे, ऑनलाईन वर्क, चुकीची लाईफस्टाईल यामुळेही या आजाराचा धोका वाढतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satyapal Malik: "अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."; सत्यपाल मलिकांचा खळबळजनक खुलासा

Dharavi Mosque: धारावी मशीद प्रकरण; बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी समितीला 8 दिवसांची मुदत, अन्यथा...

Zero to hero! शुभमन गिलने भारी पराक्रम नोंदवला, आपला Rishabh Pant ही विक्रमाच्या बाबतीत मागे नाही राहिला

Mumbai University Senate Election : उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच होणार

Delhi CM Atishi: दिल्लीत आता आतिषी सरकार! मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी संपन्न; नव्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT