लाइफस्टाइल

Health Care News : हिवाळ्यात हातापायांची बोटे सुजल्यामुळे त्रस्त आहात? मग हे उपाय ट्राय करून पाहा, लगेच मिळेल आराम

Aishwarya Musale

हिवाळ्यात आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. यामध्ये सर्दी, खोकला, ताप, पोटाशी संबंधित समस्या आणि हातापायांच्या बोटांना सूज येणे यांचा समावेश आहे. हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या पाहायला मिळतात.

विशेषत: ज्या महिला घरी पाण्यात जास्त काम करतात त्यांच्यावर त्याचा परिणाम अधिक दिसून येतो. हिवाळ्यात, आपल्या रक्तवाहिन्या आकसतात, ज्यामुळे आपण हे पाहतो. यावर मात करण्यासाठी अनेक घरगुती उपाय प्रभावी आहेत. तुमच्या घरात असलेल्या अनेक गोष्टींचा वापर करूनच तुम्ही या समस्यांपासून आराम मिळवू शकता.

हळदीच्या तेलामुळे आराम मिळेल

हळदीचे तेल बोटांची आणि पायाची सूज दूर करण्यासाठी प्रभावी आहे. मोहरीच्या तेलात हळद टाकून गरम करा. हळदीमध्ये असलेले औषधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म बोटांची सूज आणि संसर्ग कमी करतात. या हळदीच्या तेलाने मसाज करा. याशिवाय तुम्ही मोहरीच्या तेलात सैंधव मीठ मिसळूनही मसाज करू शकता.

हळद आणि मध लावा

हळद आणि मध यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे स्किनची स्वेलिंग कमी होते. कच्ची हळद बारीक करून त्यात मध घालून बोटांवर लावा. यामुळे वेदना आणि सूज यापासून आराम मिळेल.

कांद्याचा रस लावा

कांद्यामध्ये अँटी-सेप्टिक आणि अँटी-बायोटिक गुणधर्म असल्यामुळे शरीरातील सूज कमी होते. हिवाळ्यात बोटांमध्ये जळजळ आणि खाज सुटण्याचा त्रास असलेल्यांनाही यामुळे आराम मिळतो. हिवाळ्यात हातापायांची बोटे सुजत असतील तर ती कमी करण्यासाठी कांद्याचा रस लावा. नंतर ते पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी लिहिलं सोनिया परचुरेंना पत्र; म्हणाले- ही पोकळी कधीही...

IND vs NZ: 99 OUT! ऋषभ पंतचे शतक हुकल्याची खंत; पण, सर्फराज खानच्या दीडशतकाने मैदान गाजवलं

Diwali Festival 2024 : टिकाऊ, इको- फ्रेंडली आकाशकंदीलांना मागणी! बाजारपेठ सजली; किमतींमध्ये दहा टक्के वाढ

"भाई, IPL मध्ये कोणत्या टीमकडून खेळणार?" चाहत्याच्या प्रश्नावर Rohit Sharma चे भन्नाट उत्तर, Video Viral

Vijaya Rahatkar: विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती; अर्चना मुजुमदार असतील नव्या सदस्य

SCROLL FOR NEXT