जेव्हा सर्दी-खोकला, ताप अशा समस्या येतात तेव्हा लोक पटकन काय होतंय ते सांगू शकतात. मात्र जेव्हा मानसिक आजार होतो तेव्हा नक्की काय होतंय याबाबत सांगता येत नाही. ही समस्या हळूहळू वाढत जाते आणि त्याचा त्रास इतर व्यक्तींनाही होऊ लागतो. प्रत्येक वेळी एखादी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावाखाली असते.
हे सर्व ताणतणाव दूर करण्यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता. असे अनेक योगासने आणि प्राणायाम आहेत, जे केवळ तणाव दूर करत नाहीत तर तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी बनवतात.
नाडी शोधन प्राणायाम
नाडीशोधन प्राणायाम केल्याने मेंदूतील ऑक्सिजनची पातळी वाढते. हे मेंदूच्या पेशी सक्रिय करते, ज्यामुळे मन शांत होते. नाडीशोधन प्राणायाम केल्यावर तुमच्या मनाचे आणि शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते. त्यामुळे नकारात्मक विचारही तुमच्या मनातून निघून जातात. याच्या नियमित सरावाने राग, तणाव आणि चिडचिड यासारख्या समस्याही दूर होतात.
उज्जयी प्राणायाम
उज्जयी प्राणायाम थायरॉईड संप्रेरकांचे संतुलन राखण्याचे काम करते. थायरॉईड संप्रेरकांच्या असंतुलनामुळे तणाव निर्माण होतो. त्यामुळे याचा नियमित सराव केल्यास तणाव आणि थायरॉईडसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
अधोमुख श्वानासन
अधोमुख श्वानासन मेंदूतील ब्लड सर्क्युलेशन वाढविण्यास मदत करते आणि तसंच मणक्याला स्ट्रेच करण्यास याचा फायदा मिळतो. खांदे आणि पायाची मजबूती हवी असेल तर अधोमुख श्वानासन हे रक्ताला अधिक पंप करते आणि चिंता-तणावापासून दूर ठेवण्यास मदत करते. योगामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.
शवासन
ध्यानमुद्रा मध्ये झोपणे म्हणजे शवासन. तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तणाव, चिंता आणि निराशा दूर करण्यासह अत्यंत आरामदायी वाटण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरते. तुम्ही कोणत्याही योग सेशननंतर शवासन करू शकता आणि एनर्जी मिळवू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.