Weight Loss  sakal
लाइफस्टाइल

Weight Loss Tips: वजन घटवण्यासाठी रामबाण उपाय आहे कांदा, असे सेवन केल्यास वजन लवकर होऊ शकते कमी

कांद्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासही मदत मिळते, हे तुम्हाला माहिती आहे का?

Aishwarya Musale

वजन कमी करणे सोपे काम नाही. वजन कमी होण्यासाठी काही महिने लागतात, त्यादरम्यान वर्कआउटपासून डाएटपर्यंत संपूर्ण काळजी घ्यावी लागते. कळत-नकळत, पण अनेकवेळा आपण अशा गोष्टी खातो, ज्यामुळे वजन टिकून राहण्यास मदत होते. या गोष्टी नीट खाल्ले तर वजन कमी करता येते.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण रोज खात असतो आणि ज्या वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कांदा ही यापैकी एक गोष्ट आहे.

प्रत्येक भाजीत कांदा वापरला जातो. यामुळे भाजीला चव तर येतेच पण आरोग्याच्या दृष्टीनेही ती खूप फायदेशीर आहे. मात्र, येथे आम्ही तुम्हाला कांदा वजन कमी करण्यास कशी मदत करू शकतो हे सांगणार आहोत.

पोट बराच काळ भरलेले राहते

कांद्यामध्ये आढळणारे सॉल्यूबल फायबर पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. एक कप कांद्यामध्ये 64 कॅलरीज, 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 16 ग्रॅम फॅट, 7 ग्रॅम फायबर, 76 ग्रॅम साखर आणि जीवनसत्त्वे असतात.

याशिवाय कांद्यामध्ये क्वेर्सेटिन नावाचे कंपाउंड असते. या फ्लेव्होनॉइडमध्ये लठ्ठपणाविरोधी गुणधर्म आहेत, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

कांदा कसा वापरायचा

वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात कांद्याचा समावेश करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याचा रस नियमितपणे पिणे. कांदा भाजीमध्ये तळल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. कांदे पाण्यात उकळून रस तयार करता येतो.

कांद्याचे सूप

कांद्याचे सूप लंच किंवा डिनरमध्ये पिऊ शकता. चवीला उत्कृष्ट असलेले हे सूप वजन कमी करण्यासही मदत करते. तुम्ही कांद्याच्या सूपमध्ये प्रोटीनसाठी पनीर देखील वापरू शकता. याशिवाय कच्च्या कांद्याचाही आहारात समावेश करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT