लाइफस्टाइल

Mudra For Overthinking: ओव्हरथिंकींग दूर करण्यासाठी ही मुद्रा करा, काही दिवसातच फायदे दिसून येतील

Aishwarya Musale

ओव्हरथिंकिंग हा एक आजार नाही, ही एक प्रकारची नकारात्मक सवय आहे जी भूतकाळातील काही अनुभवांमुळे निर्माण होते. याचा तुमच्या भावना आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

ओव्हरथिंकिंग केल्यामुळे, तुम्हाला अँक्झायटी, पॅनीक अटॅक आणि डिप्रेशन यासारख्या मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. ही सवय आजच्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. जर तुम्हीही ओव्हरथिंकिंगचे बळी असाल तर या योगासनांच्या मदतीने तुम्ही या समस्येवर मात करू शकता.

ओव्हरथिंकिंगपासून मुक्त होण्यासाठी ही मुद्रा करा

  1. ज्ञान मुद्रा केल्याने मनाला शांती मिळते. राग, भीती, दु:ख इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो. मेंदूची कार्ये सुधारतात. स्मरणशक्ती सुधारते.

  2. वायु मुद्रा मन शांत ठेवण्यास उपयुक्त आहे. यामुळे स्मरणशक्ती वाढते. ओव्हरथिंकिंगमुळे निर्माण होणाऱ्या तणावापासून आराम मिळतो.

  3. पृथ्वी मुद्रा केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. थकवा निघून जातो.

वायुमुद्रा कशी करावी

  • वायु मुद्रा करण्यासाठी चटई पसरून शांत वातावरणात सुखासनात बसा.

  • डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या.

  • श्वासावर लक्ष केंद्रित करत राहा.

  • आपला हात मांडीवर ठेवा आणि तळहाता आकाशाकडे ठेवा.

  • इंडेक्स फिंगर थोडी वाकवा जेणेकरून ते अंगठ्याला स्पर्श करेल.

  • ही मुद्रा दररोज 15 ते 20 मिनिटे केल्यास फायदा होईल.

  • हे आसन तुम्ही बसून, उभे राहून किंवा पडून कोणत्याही प्रकारे करू शकता.

पृथ्वी मुद्रा कशी करावी

  • हे आसन करण्यासाठी सुखासनामध्ये बसा.

  • आता तुमचे तळवे तुमच्या मांडीवर ठेवा आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.

  • रिंग फिंगरलाअंगठ्याच्या टोकाशी जोडा.

  • आपल्या बोटांवर जास्त दबाव टाकू नका.

  • आता या आसनात १५ मिनिटे बसा आणि हळू हळू श्वास घ्या.

  • ही मुद्रा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता.

  • दररोज असे केल्याने चांगले परिणाम मिळू शकतात.

ज्ञान मुद्रा कशी करावी

  • हे आसन करण्यासाठी पद्मासनात बसावे.

  • आपले तळवे मांडीच्या वर ठेवा.

  • आता तर्जनी अंगठ्याच्या टोकावर ठेवा.

  • उरलेली बोटे सरळ राहतील.

  • डोळे मिटून दीर्घ श्वास घेत राहा.

  • श्वासावर लक्ष केंद्रित करत रहा.

  • या आसनाचा अर्धा तास सराव केल्यास फायदा होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर Sachin Tendulkar ची लक्ष्यवेधी पोस्ट

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट

Fastest double century : पाकिस्तानच्या Usman Khan ने झळकावले वेगवान द्विशतक, नावावर केला मोठा विक्रम

Pune Sexual Assault Case: पुणे पुन्हा हादरले! घरात घुसून नराधमाने केला महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT