लाइफस्टाइल

Bed time Yoga : शांत झोप हवी असेल तर करा 'ही' योगासनं!

जाणून घेऊया चांगल्या झोपेसाठी कोणती योगासनं आवश्यक आहेत.

Aishwarya Musale

झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी रात्री हेवी फूड खाणे म्हणजे तेल आणि मसाले असलेले अन्न खाणे, अंथरुणावर पडून मोबाईल वापरणे इत्यादी, मग सर्वप्रथम या गोष्टींपासून दूर राहा. याचा अर्थ, रात्री शक्य तितके हलके जेवण करा, कमी पाणी प्या जेणेकरून तुम्हाला वारंवार वॉशरूममध्ये जावे लागणार नाही कारण यामुळे झोपेचा त्रास होतो.

तुम्ही फक्त 5-10 वेळ काढा आणि येथे सांगितलेली योगासने करा. तुमची झोप न येण्याची समस्या बर्‍याच प्रमाणात दूर होईल. यामध्ये कोणती योगासने प्रभावी आहेत ते जाणून घेऊया.

विपरीत करणी

  • चटईवर झोपा.

  • दोन्ही पाय एकत्र ठेवा.

  • दीर्घ श्वास घेऊन दोन्ही पाय एकत्र वर करा.

  • 15-20 सेकंद पाय वरच ठेवा.

  • श्वास सोडत पाय खाली आणा.

  • हे किमान तीन वेळा करा.

बालासना

  • योगा मॅटवर गुडघ्याच्या सहाय्यावर बसा.

  • दोन्ही पायाची तळवे आणि टाचांना एकत्रित आणा.

  • हळूहळू आपले गुडघे शक्य तितके पसरवा.

  • दीर्घ श्वास घ्या आणि पुढे झुका.

  • दोन्ही मांड्यांच्या मध्ये पोट घ्या आणि श्वास सोडा.

  • कंबरेच्या मागच्या बाजूच्या भागात त्रिकास्थि (Sacrum)ला रुंद करा.

  • मानेच्या मागे डोके किंचित उचलण्याचा प्रयत्न करा.

  • टेलबोनला पेल्विसकडे खेचण्याचा प्रयत्न करा.

  • हात समोर आणा आणि आपल्या समोर ठेवा.

  • दोन्ही हात गुडघ्यांच्या रेषेत राहतील.

  • दोन्ही खांदे जमीनीला स्पर्श करतील यासाठी प्रयत्न करा.

  • 30 सेकंद ते काही मिनिटे या स्थितीत रहा.

  • हळूहळू हात पुढे ताणत श्वास घ्या.

  • पेल्विसला खाली वाकवून टेलबोनला उचला आणि सामान्य स्थितीत परत या.

जानु शीर्षासन

  • योगा चटईवर पाठ सरळ करून सुखासनात बसा.

  • डावा पाय हिप जॉइंटच्या सहाय्याने बाहेर पसरवा.

  • उजवा गुडघा आतून वाकवा.

  • उजव्या पायाचा तळवा डाव्या मांडीच्या आतील भागाच्या वर ठेवा.

  • यावेळी छाती आणि नाभी डाव्या पायासोबत असावी.

  • दोन्ही हात नितंबाच्या जवळ ठेवून आधार द्या.

  • श्वास आत घ्या. श्वास सोडताना दोन्ही हातांनी पायाची टाच धरा.

  • हात पोचले नाहीत तर गुडघ्याच्या खाली कुठेही धरा.

  • अजिबात जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे मणक्याला दुखापत होऊ शकते.

  • याच स्थितीत रहा. दीर्घ आणि संथ श्वास घेत रहा आणि श्वास सोडण्याची क्रिया चालूच ठेवा.

उत्तानासन

सर्वप्रथम, चटईवर सरळ उभे रहा.
पाय सरळ ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या आणि हात खाली करून कंबरेतून वाका.
या काळात तुमचे गुडघे वाकू नयेत हे लक्षात ठेवा.
आता हाताने बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा
आणि आपल्या गुडघ्याला नाकाने स्पर्श करा.
हे आसन केल्याने मन शांत होते आणि निद्रानाशाच्या समस्येपासून आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT