Health  sakal
लाइफस्टाइल

Health Care News: हाडांना मजबूत करण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश, जाणून घ्या

Aishwarya Musale

आपल्या शरीराची योग्य पद्धतीने हालचाल होण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव अत्यंत महत्त्वाचं कार्य बजावत असतो. यामध्येच अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा भाग म्हणजे शरीरातील हाडे. मानवाच्या शरीराला आकार व आधार देण्याचं महत्त्वाचं कार्य हाडे करत असतात.

मानवी शरीरात २०६ हाडे असून ते कनेक्टिव्ह टिशू म्हणून ओळखले जातात. हाडे ठिसूळ होणे किंवा कमकुवत होणे यांचं प्रमाण वाढलं आहे. म्हणूनच, शरीरातील बोन्स म्हणजेच हाडे स्ट्राँग होण्यासाठी कोणते उपाय करता येतील ते पाहुयात.

१. कॅल्शिअम -

आपल्या शरीराला दररोज १ हजार ते १२०० मिलीग्रॅम कॅल्शिअमची गरज असते. ही गरज आपण दूध, दुग्धजन्य पदार्थ (लोणी, तूप), नाचणी, विविध प्रकारच्या डाळी तसेच कठीण कवचाची फळे (अक्रोड, बदाम, पिस्ता, जर्दाळू) यांच्या माध्यमातून भरून काढू शकतो.

तसंच आहारात तीळ, मेथीचे दाणे, भोपळ्याच्या बिया, हिरव्या पालेभाज्या यांचाही आवर्जुन समावेश केला पाहिजे. त्यामुळे शऱीरातील कॅल्शिअमची कमतरता भरुन निघेल व हाडे मजबूत होतील.

२. व्हिटॅमिन डी -

आहारातील अतिरिक्त कॅल्शिअम शोषून घेण्यासाठी याचा उपयोग होता. यासाठी दररोज सकाळी १५ मिनीटे कोवळ्या उन्हात बसावे. तसंच आहारात अंडी, डाळ, मांसाहार याचा समावेश करावा.

३.व्यायाम -

नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे स्नायू आकुंचित पावणे, हाडांमधून आवाज येणे या समस्या दूर होतात. तसंच दैनंदिन व्यायामामध्ये त्रिकोणासन , सेतुबंधासन , भुजंगासन, वीरभद्रासन, विपरीत करणी मुद्रा या योगासनांचा समावेश करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Sabha Election 2024: ठरलं! आज दुपारपासूनच आचारसंहिता; निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, तारखा होणार जाहीर

मोठी बातमी! राज्यपाल नियुक्त ७ आमदारांचा आजच शपथविधी? शासनाकडून राजपत्र जारी; चित्रा वाघ, पंकज भुजबळ, हेमंत पाटलांचा समावेश

Ladki Bahin Yojana: 'त्या' ९० हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा नाहीच

Salman Khan-Lawrence Bishnoi: सलमान जिथे जिथे शूटिंगसाठी जाईल... अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

'एका म्यानात दोन तलवारी राहणार नाहीत, निवडणुकीत आम्ही ओबीसींबरोबर राहणार'; काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

SCROLL FOR NEXT