Health Care: Sakal
लाइफस्टाइल

Health Care: सकाळी रिकाम्या पोटी 'हा' पांढरा पदार्थ खाल्ल्यास वाढू शकतो लठ्ठपणा

Morning Health Care: सकाळी रिकाम्या पोटी ब्रेड खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे लठ्ठपणासोबतच अनेक आजार निर्माण होऊ शकतात.

पुजा बोनकिले

Morning Health Care: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत कमी वेळेत नाश्ता करण्यासाठी अनेक लोक रेडी टू इट पदार्थ खातात. तसेच सकाळी नाश्त्यात टोस्ट किंवा ब्रेड सँडविच यासारख्या पदार्थांचा समावेश करतात. हे पदार्थ जेवढे खायला चवदार लागतात तेवढेच बनवायला सोपे आहेत. पण सकाळी रिकाम्या पोटी ब्रेड खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. लठ्ठपणा, मधुमेह यासारखे अनेक आजार उद्भवू शकतात. तुम्हीही या पदार्थांचे सेवन करत असाल तर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

गॅसची समस्या

सकाळी रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्यास तुम्हाला गॅस, अपचन किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो. आहारतज्ज्ञांच्या मते रिकाम्या पोटी ब्रेड खाल्याने अॅसिडिटीची समस्या अधिक वाढू शकते..

बद्धकोष्ठता

ब्रेड मैद्यापासून बनवली जाते. ज्यामुळे पोट कोरडे पडते. अशात तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी या पदार्थाचे सेवन केल्यास पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे पोट स्वच्छ होत नाही आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी रिकाम्या पोटी ब्रेड खाणे टाळावे.

लठ्ठपणा

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रिकाम्या पोटी ब्रेड खाणे टाळावे. त्यात असलेल्या उच्च कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स वजन वाढवू शकतात.

मधुमेह

अनेकांना सकाळी चहासोबत ब्रेड खायला आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्यास मधुमेहाची समस्या निर्माण होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्यास मधुमेह होऊ शकतो. त्यात असलेले कार्बोहायड्रेट्स आणि पांढरी ब्रेड लवकर पचते आणि ग्लुकोजमध्ये रुपांतरित होते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवते. यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. यामुळे मधुमेह असलेल्या लोकांना ब्रेड खाणे टाळावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT