Asthma  sakal
लाइफस्टाइल

Asthma Attack During Diwali: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांनी अशी घ्यावी काळजी, वाढणार नाही त्रास

अस्थमा म्हणजेच दम्याच्या रुग्णांनी बदलत्या हवामानात काळजी घेणे आवश्यक आहे.

Aishwarya Musale

दिवाळीच्या सणाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. तयारी जोरात सुरू आहे. फटाके, दिव्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, दिवाळीमुळे दम्याच्या रुग्णांना अडचणी येऊ शकतात. फटाक्यांमधून निघणारा धूर अस्थमाच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकतो. अशा परिस्थितीत या टिप्सचा अवलंब करून दम्याचे रुग्ण या काळात स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतात.

दिवाळीत दम्याच्या रुग्णांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी?

बाहेर जाणे टाळा

एअर क्वालिटी आधीच खराब आहे, तर दिवाळीत फटाकेने प्रदूषण आणखीनच वाढते, त्यामुळे या वातावरणात बाहेर जाणे टाळावे. बाजार, गर्दीची ठिकाणे आणि जत्रेत जाणे टाळावे. हवेतील लहान कण फुफ्फुसात आणि वायुमार्गात प्रवेश करत असल्याने तुमच्या श्वसनाच्या समस्या वाढू शकतात.

इनहेलर सोबत ठेवावे

दम्याच्या रुग्णांनी दिवाळीनिमित्त त्यांची औषधे आणि इनहेलर सोबत ठेवावे. जर तुम्ही चुकून प्रदूषणाच्या संपर्कात आला आणि तुम्हाला अटॅक आला तर हा इनहेलर अटॅक वाढण्यापासून रोखण्यासाठी प्रभावी आहे.

फटाके फोडणे टाळा

दम्याच्या रुग्णांनी फटाके फोडणे टाळावे. कार्बन डायऑक्साइड आणि सल्फर ऑक्साईड यांसारख्या फटाक्यांमधून निघणारा धूर एलर्जीची स्थिती वाढवू शकतो. जे अस्थमाच्या रुग्णांसाठीही घातक ठरू शकते.

हायड्रेटेड रहा

अस्थमाच्या रुग्णांनी स्वत:ला सतत हायड्रेट ठेवावे. द्रव तुमच्या शरीरात पोहोचणारे विषारी पदार्थ लगेच काढून टाकतात. यामुळे ऍलर्जीचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

मास्क घालत राहा

घराबाहेर पडल्यास किंवा गच्चीवर गेल्यास मास्क लावूनच जा. याच्या मदतीने तुम्ही प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करू शकता.

मिठाई आणि अल्कोहोलपासून दूर रहा

दिवाळीच्या दिवशी जास्त गोड खाणे टाळावे. याशिवाय दारू पिणेही टाळावे. या औषधांमुळे दम्याचा झटका येऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT