लाइफस्टाइल

Stomach Cancer: ‘ही’ लक्षणे दिसल्यास वाढतो पोटाच्या कर्करोगाचा धोका; वेळीच व्हा सावध

पोटाचा कर्करोग टाळण्यासाठी त्याची लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

Aishwarya Musale

कर्करोग हा एक प्राणघातक आजार आहे. पोटाचा कर्करोग म्हणजेच जठराचा कर्करोग हा त्यातील एक प्रकार आहे. पोटाच्या कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे काही कारणामुळे पेशी पोटात असामान्यपणे पसरतात आणि वाढू लागतात. 

पूर्वी असे मानले जात होते की, पोटाचा कर्करोग मोठ्या वयाच्या लोकांनाच होतो, परंतु आता 30 आणि 40 वर्षांचे लोक देखील या आजाराला बळी पडू लागले आहेत. चुकीच्या जीवनशैलीमुळे त्याचा धोका वाढला आहे. पोटाच्या कर्करोगाला धोकादायक म्हटलं जातं.

बहुतेक लोकांना सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसत नाहीत. बहुतेक प्रकरणांमध्ये, पोटाच्या कर्करोगाची लक्षणे गंभीर किंवा शेवटच्या टप्प्यात दिसून येतात.

हळूहळू तुम्हाला त्याची काही लक्षणे दिसू लागतात. अशा परिस्थितीत पोटाची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. जाणून घेऊया सुरुवातीच्या टप्प्यात पोटाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती असू शकतात?

पोटाच्या कर्करोगाची लक्षणे

पोटाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांना सुरुवातीच्या टप्प्यात उलट्या आणि मळमळ जाणवू शकते. जर तुम्हाला सतत अशा प्रकारचा त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

छातीत जळजळ

पोटाच्या कर्करोगामुळे छातीत दुखणे आणि जळजळ होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

कमी खाल्ल्यावरही पोट भरल्यासारखे वाटते

कमी खाल्लं तरी पोट खूप भरल्यासारखं वाटणं हे देखील पोटाचा कर्करोग सूचित करते.

पोटात इन्फेक्शन होणे

पोटात इन्फेक्शन किंवा कॅन्सरची समस्या असल्यास त्या व्यक्तीला ताप आल्यासारखे वाटू लागते.

पोटदुखी

पोटाच्या कॅन्सरने त्रस्त असलेल्या रुग्णांनाही पोटदुखीच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

डायरिया किंवा बद्धकोष्ठता असणे

डायरिया आणि बद्धकोष्ठतेची दीर्घकालीन समस्या पोटाच्या कर्करोगाचे कारण असू शकते.

पोटाच्या कर्करोगाने पीडित रुग्णाच्या लाल रक्तपेशी लक्षणीयरीत्या कमी होऊ लागतात.

अशी लक्षणे तुमच्या शरीरात दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. जेणेकरून तुमचे उपचार वेळेवर सुरू करता येतील.

भूक न लागणे

अचानक आणि कोणत्याही कारणाशिवाय व्यक्तीला भूक लागणे थांबते. त्याला काही खावेसे वाटत नाही आणि त्याची आवडती वस्तू पाहूनही पोट भरलेले आहे, असे वाटते. ताटातील थोडं काही खाल्यानंतर लगेच पोट भरल्यासारखं वाटतं. ही पोटाच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

SCROLL FOR NEXT