लाइफस्टाइल

Health Care news : तुम्हालाही अन्न पचनाचा त्रास्त होतोय? मग 'या' सवयी आजच सोडा..

तुम्हाला पचनाच्या समस्या टाळायच्या असतील तर 'या' सवयी आजच सोडा.

Aishwarya Musale

निरोगी राहण्यासाठी योग्य जीवनशैली निवडणे खूप महत्वाचे आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अनियमित जीवनशैलीमुळे आपले आरोग्य बिघडते. विशेषतः आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा पचनक्रियेवर सर्वाधिक परिणाम होतो.

अशा परिस्थितीत त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आपली पचनशक्ती खराब असते, अन्नाचे नीट पचन होत नाही, शरीराला अन्नातील पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत आणि त्यामुळे शरीरात आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता निर्माण होते. तुम्हाला तुमची पचनक्रिया सुधारायची असेल तर तुम्हाला या 4 सवयी सोडून द्याव्या लागतील.

खूप स्ट्रेस घेणे

तणावाचा आपल्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. जास्त ताण घेतल्याने शरीरात हार्मोनल असंतुलन होऊ शकते. यामुळे पचनाच्या समस्या आणि आतड्यांतील बॅक्टेरियाचे असंतुलन होऊ शकते. हे जळजळ देखील प्रभावित करते.

अँटीबायोटिक्स जास्त घेणे

अनेकदा डॉक्टर कोणताही संसर्ग किंवा इतर रोग बरा करण्यासाठी अँटीबायोटिक्स घेण्याचा सल्ला देतात. त्यांचा डोस आणि ते किती दिवस घ्यायचे हे आजारावर अवलंबून असते. पण जास्त प्रमाणात अँटिबायोटिक्स घेतल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अतिरिक्त अँटीबायोटिक्स आपल्या आतड्यांमधले चांगले आणि वाईट दोन्ही बॅक्टेरिया नष्ट करतात, ज्यामुळे पचन आणि आतड्यांचे आरोग्य खराब होते.

योग्य प्रमाणात पाणी पिणे

निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. कमी प्रमाणात पाणी प्यायल्यास त्याचा पचनावर परिणाम होतो. कमी पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता निर्माण होते आणि आतड्यांच्या कार्यावरही वाईट परिणाम होतो.

आहारात योग्य प्रमाणात फायबर असणे आवश्यक

आहारात योग्य प्रमाणात फायबर असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता तर होतेच पण आतड्यातील बॅक्टेरियावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे जे लोक कमी फायबर घेतात त्यांची पचनशक्ती खराब असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT