लाइफस्टाइल

Diet for PCOD: पीसीओडीचा त्रास होत असल्यास हिवाळ्यात कसा असावा डाएट? जाणून घ्या सविस्तर

पीसीओडीचा त्रास असणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

Aishwarya Musale

पीसीओडी ही हार्मोनल कंडीशन आहे. जे गेल्या काही वर्षात महिलांमध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे महिलांची फर्टिलिटी आणि पीरियड्स या दोन्हींवर परिणाम होतो. या आरोग्य स्थितीत, स्त्रियांच्या अंडाशयात गाठी तयार होतात.

अनियमित मासिक पाळी येणे, पीरियड्समध्ये फ्लो कमी जास्त होणे, चेहऱ्यावर नको असलेले केस येणे, वजन वाढणे, ही सर्व लक्षणे PCOD मध्ये दिसतात. हे नियंत्रित करण्यासाठी, आहारात बदल करणे सर्वात महत्वाचे आहे.

याशिवाय योग्य जीवनशैलीही पाळली पाहिजे. हिवाळ्यात काही खास गोष्टींचा आहारात समावेश करून PCOD ची लक्षणे बर्‍याच प्रमाणात नियंत्रित करता येतात.

PCOD साठी हळद

PCOD ग्रस्त महिलांसाठी हळद खूप फायदेशीर आहे. ज्या महिलांमध्ये PCOD आहे त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते आणि फ्री रॅडिकल्स जास्त असतात. हळदीमध्ये कर्क्यूमिन अँटी-इंफ्लेमेटी कम्पाउंड आहे आणि हे जळजळ कमी करते. यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

PCOD मध्ये आले खा

PCOD मध्ये महिलांनी आल्याचे सेवन करणे आवश्यक आहे. विशेषतः आले हिवाळ्यात खूप फायदेशीर आहे. हे जळजळ कमी करते आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी करते.

PCOD मध्ये लिंबू फायदेशीर आहे

पीसीओडीमध्येही लिंबू फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. हे रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. शरीरात साचलेले टॉक्सिन्सही अनेक समस्यांचे कारण बनतात.

PCOD मध्ये आवळा खा

PCOD मध्ये आवळा खाणे फायदेशीर मानले जाते. त्यात व्हिटॅमिन सी असते. आवळा केवळ हार्मोन्स संतुलित करत नाही तर ते अँटी-इंफ्लेमेटरी आहे. आवळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सही मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT