Heat Wave Sakal
लाइफस्टाइल

Heat Wave: उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी घ्यावी योग्य काळजी, आरोग्य मंत्रालयाने दिला सल्ला

Summer Care Tips: ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना उष्माघाताबाबत जागृत करणे आणि त्यांना योग्य त्या सोया देणे गरजेचे आहे अशी सुचना आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

पुजा बोनकिले

Summer Care Tips: तापमानात सतत होणाऱ्या वाढीमुळे अनेक समस्या सामोरे जावे लागत आहे. लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. उन्हामुळे लोकांना दिवसाच नाही तर रात्रीही आराम मिळत नाही. देशातील अनेक राज्ये आणि शहरांमध्ये पारा 50 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आरोग्य मंत्रालयाने ऑफिसमध्ये देखील अति उष्णता आणि उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या एक्स या सोशल मिडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी ऑफिसमध्ये पिण्याच्या पाण्याची समान सुविधा देण्यास सांगितले आहे. तसेच, कर्मचाऱ्यांना कडक उन्हात बाहेर कामासाठी पाठवणे टाळण्यास सांगितले आहे. जेव्हा हवामान थंड असेल तेव्हाच बाहेरील कामास पाठवावे तसेच कर्मचाऱ्यांना विश्रांती करायला वेळ द्यावा.

आरोग्य मंत्रालयाच्या सूचना

आरोग्य मंत्रालयाने कर्मचाऱ्यांना उष्माघात झाल्यास कोणती लक्षणे दिसतात याचे प्रशिक्षण देण्याचा सल्लाही दिला आहे. डोकेदुखी, चक्कर येणे, डिहायड्रेशन आणि श्वसना संबंधित समस्या ही उष्माघाताशी संबंधित आजाराची सामान्य लक्षणे आहेत.

उष्माघाताची लक्षणे

शरीरात पाण्याची पातळी कमी होणे, डोकेदुखी, चक्कर येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही उष्माघाताची सामान्य लक्षणे आहेत. याशिवाय उष्माघातामुळे जुलाब , टायफॉइड, त्वचा संक्रमण यांसारख्या समस्यांचीही उद्भवू शकतात. उन्हाळ्यात या समस्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

पुढील लोकांना उष्माघाताचा धोका जास्त

काही लोकांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. जे लोक खूप मद्यपान करतात, पुरेसे पाणी पीत नाहीत, तसेच हृदय व मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असतात अशा लोकांना उष्माघात लवकर होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT