लाइफस्टाइल

आहारवेद कोकम; ९ शारीरिक समस्यांवर आहे गुणकारी

शर्वरी जोशी

उन्हाळा हा ऋतू आला की अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. सतत येणारा घाम, उकाडा यामुळे सारेच बेजार होतात आणि परिणामी, चिडचिड करण्याचं प्रमाणही वाढतं. परंतु, त्रागा करण्यापेक्षा हा उन्हाळा सुसह्य कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. फ्रिजमधील गार पाणी पिण्याऐवजी त्या जागी ताक, लिंबू सरबत, कोकम सरबत यांचं सेवन जास्तीत जास्त करावं. उन्हाळ्यात आपल्याला घाम खूप जास्त येतो त्यामुळे शरीरातील क्षार कमी झालेले असतात. तसंच शरीरातील पाण्याचं प्रमाणही कमी झालेलं असतं. त्यामुळे सतत पाणी पिणे गरजेचं आहे. यातच ताक किंवा कोकम सरबत प्यायल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरुन निघण्यासोबतच अन्य काही शारीरिक समस्या असतील तर त्यादेखील दूर होतात. त्यामुळे आज कोकम सरबत पिण्याचे किंवा आहारात कोकमचा समावेश करण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. कोकम सरबत प्यायल्यामुळे अपचन दूर होतं.

२. कोकमाचं सेवन केल्यामुळे आम्पपित्त, दाह, सतत तहान लागणे या समस्या दूर होतात.

३. उष्णतेचे विकार दूर होतात.

४. शौचास गेल्यावर रक्त पडत असेल तर ती समस्या दूर होते.

५. पित्तामुळे अंगावर पुरळ आलं असेल तर त्यावर कोकम आगळ चोळून लावावा.

६. उष्णतेमुळे त्वचा कोरडी होत असेल तर त्यावर कोकमाचं तेल लावावं.

७. शरीराची आग होत असेल तर कोकम तेल लावावे.

८. ओठांची सालं निघत असतील तरीदेखील त्यावर कोकमाचे तेल लावावे.

९. कोकमाच्या सेवनामुळे पोट साफ होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata Funeral : रतन टाटांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईत वाहतुकीत बदल; 'या' रस्त्यावर वाहनांना 'नो' एंट्री

पाकिस्तानची वाट लावली! Harry Brook चे त्रिशतक, जो रूटसह मोडला ९० वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड; इंग्लंड ७९० पार

Pune Porsche Crash Case : तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावणाऱ्या 'त्या' दोन अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई!

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी रतन टाटा यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाषणाकडे लक्ष

SCROLL FOR NEXT