Health Tips : काही लोकांच्या दिवसाची सुरूवात चहाने होते. तर काही लोक लिंबू पाणी पिऊन समाधान करतात. सकाळी उठल्या-उठल्या कॉफी पिणारे लोकही आहेत. कॉफीमुळे दिवस प्रसन्न होतो, फ्रेश वाटतं अशी त्यांची भावना असते. दिवसभरातही त्यांच्या डेस्कवर कॉफीच्या कपांचा थर लागलेला असतो.
काही लोक झोप येते म्हणून रिफ्रेश व्हायला कॉफी घेतात. तर काही लोक झोप येत नाही म्हणून मध्यरात्रीही कॉफीचे सेवन करतात. खरं पहायचं झालं तर, कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये निद्रानाशाचे प्रमाण वाढले आहे.
निद्रानाशामुळे दिवसभर ग्लानी येणं, थकवा वाटणं, चिडचिड होणं, कुठल्याही गोष्टीत एकाग्र न होणं, विस्मरण होणं, निरुत्साह, निर्णय क्षमता घटणं, वजन वाढणं, प्रतिकार शक्ती कमी होणं, मधुमेह, हृदयविकार, पचनाच्या तक्रारी आणि इतर शारीरिक तसंच मानसिक व्याधी या गोष्टी होऊ शकतात.
होय, हे आम्ही नाही तर संशोधक म्हणत आहेत. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, या त्रासातून सुटका व्हावी म्हणून काय करावं, याची माहिती घेऊयात.
Happy Beds संस्थेचे CEO आणि विषेशज्ञ रेक्स इसॅप यांनी सांगितले की, दिवसभरात आपला मेंदू एडेनोसिन नावाचे एक रसायन निर्माण करत असते. जे आपल्या शांत झोपेसाठी गरजेचं असतं.
म्हणजेच तुम्हाला शांत झोप हवी असेल तर तर एडेनोसिन रसायन तयार होणं गरजेचं आहे. पण, कॉफी या रसायनाला तयार होण्यापासून रोखते. त्यामुळे तुम्हाला निद्रानाशाचा त्रास सुरू होतो.
तुम्हाला हा त्रास मागे लावून घ्यायचा नसेल. तर, त्यासाठी शरीरात कार्टिसोल हार्मोन (स्ट्रेस हार्मोन) कमी होण्यापर्यंत वाट पहावी लागते. हे हार्मोन्स कमी झाले की, मगच कॉफी प्यावी,असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे.
रेक्स यांनी पुढे सांगितलं की, कॉफी पिण्याला तुम्ही वेळकाळ पाळत नसाल. इच्छा होईल तेव्हा कॉफी घेत असाल तर लाइफस्टाइलमध्ये थोडा बदल करावा लागेल. त्यासाठी उठल्या-उठल्या कधीही कॉफी घेऊ नका. केवळ पाणी प्या. एक ग्लास पाण्याने दिवसाची सुरूवात करा.
कारण, सकाळी उठल्यावर आपली कोर्टिसोलची पातळी जास्त असते. तुम्ही सकाळी कॉफीचे सेवन केल्याने कोर्टिसोल आणि कॅफेनचे मिश्रण होऊन तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळेच सकाळी तर कॉफी घेऊच नका.
पण, इतरवेळीही कॉफी पिताना काळजी घेण्यास तज्ज्ञांनी सांगितलं आहे. एकदा कॉफी पिल्यानंतर त्यातील कॅफेनचे विघटन व्हायला सात ते आठ तास लागतात. त्यामुळे जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर तुम्ही दुपारी दोनच्या सुमारास कॉफी घ्यावी. त्यानंतर घेऊ नका. कारण, दुपारनंतर घेतलेली कॉफी शरीरात राहते आणि रात्री तुम्हाला शांत झोप लागत नाही. (Sleep)
शांत झोपेसाठी करा हे उपाय
रात्र झोपताना एक ग्लासभर दूध पिऊन झोपा
दुधात जायफळ, बडिशोप मिक्स केलीत तर त्याचाही फायदा होतो.
रात्री झोपताना मोबाईल जवळ ठेऊ नका,मोबाईलच्या रेडिएशनमुळेही झोपेचे बारा वाजतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.