Boil Milk sakal
लाइफस्टाइल

Boil Milk: एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!

दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Aishwarya Musale

दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात बरीच जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यातून आपल्याला पोषण मिळते आणि शरीर मजबूत बनण्यात मदत होते. परंतु, आपण दूध उकळताना अनेकदा चूक करतो, त्यामुळे आपल्याला दूध पिण्याचा पुरेपूर फायदा मिळू शकत नाही.

दुधामध्ये अनेक प्रकारे पोषक तत्व आढळतात, ज्यामुळे आपले शरीर मजबूत होते, परंतु अनेकदा लोक दूध उकळताना मोठी चूक करतात. त्यामुळे तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही. खरं तर, अनेक स्त्रिया दूध घट्ट करण्यासाठी आणि त्यातून मलई काढण्यासाठी बऱ्याच वेळा दूध उकळतात. पण असे करणे अजिबात योग्य नाही. चला जाणून घेऊया दूध सतत उकळल्याने काय होते.

दूध सतत उकळणे योग्य आहे का?

उकळलेले दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण त्यात अनेक हानिकारक बॅक्टेरिया असतात, त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यांना मारण्यासाठी दूध उकळले जाते. पोषणतज्ञांच्या मते, दूध कोणत्याही प्रकारचे असो, ते एकदा ते दोनदा उकळणे योग्य आहे.

यापेक्षा जास्त दूध उकळल्याने त्यातील चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात. दूध उकळल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. त्यामुळे त्यात असलेली प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम यांचा आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही.

दूध हे व्हिटॅमिन डीने समृद्ध मानले जाते जे कॅल्शियम शोषण्यास मदत करते. दुधाला वारंवार उकळल्याने त्यातील या जीवनसत्त्वाचे प्रमाणही कमी होऊ शकते, ज्यामुळे कॅल्शियमचे शोषण कमी होऊ शकते, ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात.

दुधाचे पोषण कायम ठेवण्यासाठी ते नेहमी कमी तापमानात ठेवा आणि थोडे पाणी घाला. पोषणतज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही दूध एकदा उकळून घ्या आणि जेव्हा तुम्हाला ते प्यायचे असेल तेव्हा तुम्ही ते कोमट पिऊ शकता. दूध सतत उकळण्याची गरज नाही.

दूध उकळण्याची योग्य पद्धत कोणती?

जर तुम्हाला दुधात असलेले पोषक तत्व नष्ट होऊ नयेत आणि दूध पिण्याचे योग्य फायदे मिळावेत असे वाटत असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला दूध उकळण्याची योग्य पद्धत सांगत आहोत.

सर्व प्रथम एका भांड्यात दूध काढून गॅसवर ठेवा. नंतर गॅस मंद करा.आता दूध उकळत असताना चमच्याने सतत ढवळत राहा. दुधाला उकळी येताच लगेच गॅस बंद करा.लक्षात ठेवा फार गरम दूध कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT