Health Tips Sakal
लाइफस्टाइल

Health Tips: फळं की फळांचा ज्यूस? शरीरासाठी योग्य काय? जाणून घ्या

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी, प्रत्येकजण आहारात फळांचा समावेश करतो.

Aishwarya Musale

अनेकदा डॉक्टर किंवा आरोग्यतज्ज्ञ सांगतात की रोज एक फळ किंवा ज्यूस प्यायला हवा. असे काही लोक आहेत जे दिवसाची सुरुवात फळ किंवा ज्यूसने करतात. पण तुम्ही तुमच्या शरीरानुसार योग्य फळे खात आहात का? कारण अनेकांना कोणत्या फळाची अॅलर्जी आहे आणि कोणत्या फळाचा फायदा होतो हेही माहीत नसते.

फळांमध्ये अशी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. फळे शरीरासाठी देखील आवश्यक असतात कारण त्यातील नैसर्गिक गोडवा म्हणा किंवा साखर शरीरासाठी फायदेशीर असते. आता प्रश्न पडतो की सकाळी रिकाम्या पोटी फळ की ज्यूस पिणे योग्य आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमच्यासाठी काय योग्य आहे.

वजन कमी करण्यासाठी फळं खूप प्रभावी आहेत

फळे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. फळामध्ये भरपूर फायबर असते जे पोटाच्या पचनसंस्थेसाठी खूप चांगले असते, तसेच वजन कमी करण्यात आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यात हे फळ महत्त्वाची भूमिका बजावते.

फळांमध्ये असलेले जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स शरीरातील क्रॉनिक आजार दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. यामध्ये तुम्ही बेरी, सफरचंद, पीच, लिंबूवर्गीय फळे आणि द्राक्षे खाऊ शकता. तुम्हाला संतुलित आहार घेणे आवश्यक आहे, ज्यामध्ये धान्य, भरपूर भाज्या, लीन प्रोटीन यांचा समावेश आहे.

फळांचा ज्यूस प्यावा किंवा नाही

फळांचा ज्यूस पिताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या की ज्यूस फक्त एका फळापासून बनत नाही, अनेक फळे त्यात मिसळलेली असतात. मात्र, अनेक फळांची चव चाखायची असेल तर ज्यूस पिऊ शकतो.

पण फळांचा ज्यूस बनवल्यानंतर त्यातील फायबरचे प्रमाण कमी होते. फळांचा रस बनवताना त्यातील पोषक आणि अँटीऑक्सिडंट्स कमी होतात. त्यात असलेली साखर आणि कॅलरीजही वाढतात. जे पॅक केलेले ज्यूस पितात त्यांच्या आरोग्यासाठी ते अत्यंत हानिकारक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT