Health Tips : आरोग्याची कोणतीही तक्रार नसताना काहीवेळ अचानक शरीरावर सूज चढायला लागते. तेव्हा शरीराला काहीतरी मोठ्या आजाराची लागण झालीय असं वाटायला लागतं. शरीरात होत असलेले बदल आपल्याला मोठ्या आजाराचे संकेत देत असतात.
आता पाय सुजण्याचंच घ्या,एखादी जखम झाली, पाय मुरगळला तरी पाय हत्तीसारखा टम्म फुगतो. प्रेगन्सीत तर ही समस्या रोजचीच आहे.
महिलांमध्ये काही समस्या सामान्य असतात. जसे कंबरदुखी, पाठदुखी, पाय दुखणे. यापैकी जळजळ, सूज आणि पाय दुखणे. बहुतेक महिलांना या समस्येतून जावे लागते. पण अनेक वेळा घरातील कामं आणि जबाबदाऱ्यांमुळे महिला या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.
आपल्या शरीराचे सर्व अवयव महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत जेव्हा शरीराला काही आजार होण्याची शक्यता असते, तेव्हा शरीर काही संकेत देते. अशा प्रकारे, आपण त्यांना ओळखू शकतो आणि त्यांच्यावर योग्य उपचार करू शकतो आणि गंभीर आजार टाळू शकतो.
त्याचप्रमाणे, जेव्हा तुमची किडनी खराब होते, तेव्हा शरीर काही विशेष संकेत देऊ लागते. ज्यामध्ये पायांना सूज येणे आणि जळजळ होणे सामान्य आहे. जेव्हा पुरेशा प्रमाणात सोडियम आपल्या किडनीपर्यंत पोहोचत नाही, तेव्हा किडनी नीट काम करणे थांबवते. त्यामुळे सर्वप्रथम पायांना सूज येण्याची समस्या सुरू होते.
सूज, वेदना, पायात जळजळ होणे ही मूत्रपिंड निकामी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. याशिवाय किडनी खराब झाल्यावर शरीराचे हे अवयव सिग्नल देऊ लागतात.
जर तुमच्या पायाला किंवा घोट्याला सूज, वेदना आणि जळजळ होत असेल तर समजून घ्या की तुमची किडनी नीट काम करत नाहीये. यासाठी तुम्ही सावध राहून डॉक्टरांशी संपर्क साधावा.
जेव्हा तुम्ही लघवी नीट करत नाही, म्हणजेच त्यात फेस आणि बुडबुडे तयार होऊ लागले आहेत, याचा अर्थ शरीरातून लघवीद्वारे प्रथिने बाहेर पडत आहेत. जे किडनी खराब होण्याचे लक्षण असू शकते. म्हणून, या लक्षणाबद्दल सावधगिरी बाळगा.
जर तुम्हाला तुमच्या स्नायूंमध्ये तीव्र वेदना होत असतील तर याचा अर्थ मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत. अशावेळी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्समध्ये गडबड होते. जेव्हा शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसची लक्षणीय कमतरता असते तेव्हा हे घडते. (Healthy Kidney)
जर तुम्हाला सतत मळमळ किंवा उटल्या होत असतील. तर हे सुद्धा किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे. तुम्हाला पित्त झाले नसेल, विषेशत: महिलांमध्ये गर्भवती असताना हा त्रास होतो. पण, असं काही नसताना तुम्हाला मळमळत असेल तर वेळीच तपासण्या करून घ्या.
शरीरात कोणताही बदल होत असेल तर सर्वांनाच होणारा त्रास म्हणजे मुड स्विंग्स होय. कारण, शरीरात होत असलेल्या गंभीर आजाराचा परिणाम आपल्या मनावर होतो आणि कधी चिडचिड होते. तर कधी निराश वाटतं, हसणारी व्यक्ती एका क्षणात रडते या गोष्टीकडेही गांभिर्याने घेतलं पाहिजे. (Mood Swings)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.