लाइफस्टाइल

Work From Home चा परिणाम; वाढत्या वजनामुळे नागरिक त्रस्त

शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूने नुसता उच्छाद मांडला आहे. त्यामुळे वर्षभरापासून प्रत्येक जण घरातच अडकून पडला आहे. घराबाहेर पडण्याची मुभा नसल्यामुळे आज अनेकांना घरी राहून ऑफिसचं काम करावं लागत आहे. परिणामी, सतत एकाच जागी बसून बैठी काम केल्यामुळे अनेक जणांमध्ये शारीरिक व्याधी उद्भवू लागल्या आहेत. यात अनेक जण वाढत्या वजनामुळेही त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच वाढलेलं वजन नियंत्रणात आणण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ते जाणून घेऊयात.

 १. सकस पदार्थ खावेत–
कायम घरात तयार करण्यात आलेल्या पदार्थांचच सेवन करावं. तेलकट, जंकफूड, मसालेदार या पदार्थांचं सेवन कटाक्षाने टाळावं. बाहेरील पदार्थ पूर्णपणे बंद करावेत. शक्य होईल त्याप्रमाणे आहारात जास्तीत जास्त पालेभाज्या, फळे यांचा समावेश करावा.

२. कोशिंबीर, सूपचं सेवन करा -
काही भाज्या या कच्च्या खाल्यामुळे शरीराला त्याचा फायदा होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे मुळा,काकडी, गाजर, कांदा या भाज्या कच्च्या खाव्यात किंवा त्याची कोशिंबीर  करून खावी. तसंच दररोज जेवतांना टोमॅटो सूप किंवा अन्य भाज्यांचं सूप घ्यावं.

३. आहार प्रमाणात ठेवा -
शक्यतो जेवतांना विचारपूर्वक जेवा. भरगच्च ताट भरुन घेण्यापेक्षा जितकं लागेल तितकेच पदार्थ ताटात घ्या. त्यामुळे जेवणावर नियंत्रण राहिलं.

४. जेवणाचं वेळापत्रक तयार करा -
काही जणांना सतत काही ना काही चघळायची सवय असते. मात्र, ही सवय अत्यंत चुकीची आहे. त्यामुळे जेवणाचं एक वेळापत्रक तयार करा. यात सकाळचा नाश्ता भरगच्च, दुपारचं जेवण कमी आणि रात्रीचे जेवण अगदीच कमी घ्यावं. त्यामुळे तुमच वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

 ५.पुरेशी झोप घ्या –
शरीराच्या योग्य वाढीसाठी आणि आरोग्यासाठी झोप अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे ७ तास झोप ही शरीराला मिळालीच पाहिजे.

६. व्यायाम करा -
घरात राहिल्यामुळे सुस्तपणा येतो. मात्र, कंटाळा न करता दररोज व्यायाम करा आणि स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यायाम दररोज जमत नसेल तर निदान आठवड्यातून दोन दिवस सूर्यनमस्कार तरी नक्की करा.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandwad Deola Assembly Elecation: भाजपची यादी जाहीर होताच पेटला दोन भावांमध्ये संघर्ष! राजीनामा देणार अन् मैदानात उतरणार...

Name Change Of Constituency: औरंगाबाद, अहमदनगर, अन् उस्मानाबाद मतदारसंघांची नावे कधी बदलणार? मतदारांच्या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळालं

Mahayuti: पाथरी मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला, राजेश विटेकर की निर्मलाबाई विटेकर कोण असणार उमेदवार?

Marathwada Rain : पावसामुळे सोयाबीन, मुग, ज्वारीसह कपाशीचेही मोठे नुकसान; शेतकरी चिंतेत

ओबीसी-मराठा वादावर छगन भुजबळांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, 'सर्वच पक्षांत मराठा समाजातील उमेदवार, त्यामुळे..'

SCROLL FOR NEXT