लाइफस्टाइल

Healthy Diet : फॉस्फरस असलेले पदार्थ खाल तर किडन्या होतील बाद,  या पदार्थांचे सेवन वाढवेल किडनीचे आयुष्य

किडनीच्या आजाराची सुरुवातीची काही लक्षणं कोणती?

Pooja Karande-Kadam

Healthy Diet : ओळखीत असलेल्या एका ५० शी गाठलेल्या व्यक्तीचा परवाच मृत्यू झाला. कोणतंही व्यसन नाही की इतर काही सवयी नाहीत. तरीदेखील या व्यक्तीचा मृत्यू झाला. तेही केवळ किडनी फेल झाली म्हणून. केवळ दोन दिवस पोटात दुखलं आणि तिसऱ्या दिवशी त्या व्यक्तीची प्राणज्योत मालवली.

खरं तर संबंधित व्यक्तीला किडनीचे दुखणे होतेच. त्याने याकडे कानाडोळा केला. अन् तेच जिवावर बेतले. कारण आपल्याला झालेल्या काही आजारांना हलक्यात घेऊन चालत नाही.

किडनी हा आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. किडनी आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकते. परंतु आपल्या किडनीमध्ये काही आजार असल्यास किंवा ती नीट काम करणे थांबवल्यास सर्व कचरा आपल्या शरीरात जमा होऊ लागतो.

त्यामुळे किडनीची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तुम्ही जे खाता त्याचा थेट परिणाम तुमच्या किडनीवर होतो. त्यामुळे आहारात अतिशय विचारपूर्वक अन्नपदार्थांचा समावेश करावा.

किडनीचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी योग्य आहाराचा अवलंब केला जातो. यामध्ये सोडियम, फॉस्फरस आणि पोटॅशिय आहारात कोणते पदार्थ आहेत, त्यांचे सेवन कसे कमी करावे. तसेच किडनी चांगली रहावी यासाठी काय करता येईल, हे पाहुयात.

किडनीच्या आजाराची सुरुवातीची काही लक्षणं पुढील प्रमाणे -

  1. कमी लघवी लागणे.

  2. सांधेदुखीचा त्रास होणे.

  3. धाप लागणे.

  4. लघवीचा रंग बदलणे  

या पदार्थात जास्त आढळतो फॉस्फरस

  • बटाटा

  • दही

  • सोयाबिन

  • चीज

  • वटाणा

  • ओट्स

  • राजमा

  • ब्राऊन राईस

या पदार्थांचा करा आहारात समावेश

सॅल्मन फिश

सॅल्मन, कॉड, ट्यूना यांसारख्या फॅटी माशांमध्ये प्रथिने आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड आढळतात. त्यामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते, त्यामुळे ते रक्तदाब कमी करण्यास मदत करते. उच्च रक्तदाबामुळे किडनीचा त्रास होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे फॅटी मासे खाल्ल्याने किडनी संबंधित समस्या कमी होऊ शकतात.

बेरी

बेरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यासोबतच यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाण कमी असते. या कारणास्तव ते किडनीसाठी फायदेशीर आहे. यासोबतच त्यात अँथोसायनिन देखील आढळते, जे आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते.

अंडी

संपूर्ण अंड्यापेक्षा अंड्याचा पांढरा भाग जास्त महत्त्वाचा आहे. अंड्याचा पांढरा भाग ज्याला अंड्याचा बलक देखील म्हणतात. तो अधिक फायदेशीर आहे. त्यात असे प्रोटीन आढळते, जे किडनीसाठी फायदेशीर आहे. अंड्यातील पिवळ बलकमध्ये फॉस्फरस आढळतो, जे किडनीसाठी हानिकारक आहे. (Kidney Disease)

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई आढळते आणि त्यात फॉस्फरस अजिबात नाही, ज्यामुळे ते मूत्रपिंडाच्या आहाराचा एक उत्कृष्ट भाग बनते. त्यात दाहक-विरोधी घटकही आढळतात. त्यामुळेच ते किडनीसाठी फायदेशीर आहे.

लाल शिमला मिरची

यामध्ये मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. यासोबतच यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे याचे सेवनही करणे फायद्याचे ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT