Healthy Food esakal
लाइफस्टाइल

Healthy Food : पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांना हरवायचंय तर घरातील हे सुपरफुड्स खा, आजार दूर पळतील

Healthy Food For Monsoon: पावसाळ्यात होणारी ही प्रक्रिया अनेक प्रकारचे जीवाणू आणि विषाणूंना जन्म देते. ज्यामुळे संसर्ग देखील होतो.

सकाळ डिजिटल टीम

Healthy Food For Monsoon:

सध्या पावसाळा हा आजारांचा सीजन मानला जातो. कारण पावसाळ्यात अनेक प्रकारचे साथीचे रोग व्हायरल इन्फेक्शन पसरते.  कारण, पावसामुळे आर्द्रता निर्माण होते, जी पाऊस पडेपर्यंत थंडी जाणवते, परंतु जेव्हा पाऊस थांबतो आणि पुन्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा वातावरण खूप दमट होते.

पावसाळ्यात होणारी ही प्रक्रिया अनेक प्रकारचे जीवाणू आणि विषाणूंना जन्म देते. ज्यामुळे संसर्ग देखील होतो. उन्हाळ्यानंतर पडणाऱ्या पावसामुळे आर्द्रता निर्माण होते. ज्यामुळे पाऊस पडेपर्यंत थंडी जाणवते. परंतु या हंगामात पावसामुळे संसर्ग होणे ही एक सामान्य समस्या बनते.

 आंबट फळे

आंबट गुणधर्म असलेल्या फळांचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे संत्री,मोसंबी आणि लिंबूवर्गीय फळांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. तुम्ही वातावरण पाहून या फळांचे सेवन करावे. आणि ही फळ खूपच आंबट असतील तर खाऊ नये. रसाळ गोड चवीला असती तरच याचे सेवन करा.

माशांचे सेवन करा

तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही माशांचे सेवनही करू शकता. मॅकरेल, ट्युना सॅलमन अशा माशांचे सेवन करा. या माशांमध्ये ओमेगा फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात असते. ज्याचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आलं

तुम्ही आल्याचा वापर चहा, मसाल्यात केला असेल. आल्याचा चहा पिणे पावसाळ्यात सर्वांनाच आवडते. पण, पावसाळ्यात आल्याचे सेवन केल्याने तुम्ही या आजारांशी बिनधास्त लढू शकता.

लसूण

पावसाळ्यात अँटीबायोटिक आणि अँटी-व्हायरस गुणधर्म असलेल्या लसणाचे सेवन देखील खूप फायदेशीर आहे. यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत. हे कोलेस्ट्रॉल कमी करते, रक्तदाब नियंत्रणात ठेवते आणि पचनाला चालना देते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आजारांचा धोका टळतो.

कारले

मधुमेहावर कारले उपयुक्त ठरते. अँटीव्हायरल गुणधर्म असलेल्या कारल्याचे सेवन औषध म्हणून फायदेशीर आहे. हे संक्रमण टाळण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT