Healthy Fruit esakal
लाइफस्टाइल

Healthy Fruit: शरीराला स्वच्छ धुवून काढतं हे छोटंस लालचुटूक फळ, फायदे वाचा अन् लगेचच खायला सुरू करा

सकाळ डिजिटल टीम

Healthy Fruit:

लोकांना उन्हाळ्यात लिची खायला आवडते. हे छोटे फळ शरीराला अनेक मोठे फायदे देते. हे चवीला खूप गोड असते. अनेक लोक लिची ज्यूस, जेली, कॉकटेल आणि आइस्क्रीममध्ये घालून खातात. ज्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

लिची उन्हाळ्यात खायलाच हवी आणि हे हंगामी फळ तुम्हाला लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि इतर अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करते. (Summer Health) 

लिची उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मिळते. 18 व्या शतकात लिचीचे भारतात उत्पादन सुरू झाले. त्याआधी हे फळ फक्त चीनमध्येच उपलब्ध होते. आकाराने लहान असून त्यावरील साल कठीण असते. चवीला गोड असलेले हे फळ लाल रंगाचे असते. लिची फळाचे आपल्या शरीराला काय फायदे आहेत याबद्दल जाणून घेऊयात.

तांबड्या रक्त पेशी वाढवते

लिची हे फळ तांबड्या रक्तपेशी वाढवण्यात मदत करते. ज्या लोकांना तांबड्या रक्तपेशी कमी झाल्या आहेत अशा लोकांना सलाईन्समधून त्या चढवल्या जातात. पण सलाईनसोबतच हे फळ खायला दिले तर रक्तपेशी अधिक वेगाने वाढू शकतात.

शरीराची स्वच्छता होते

तुम्हाला माहितीच असेल की, आपल्या शरीराची स्वच्छता यकृत करते. यकृत शरीरातील घातक विष आणि घाण काढून टाकण्याचे काम करते. पण, आपली लाइफस्टाईल आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे यकृतच आजारी पडते. असे होऊ नये यासाठी लिची फळाचे सेवन करायला हवे. लिचीमध्ये असलेले आरोग्यदायी गुणधर्म यकृताचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतात.

कॅन्सरपासून होते रक्षण

लिचीचे सेवन केल्याने कॅन्सरसारख्या धोकादायक आजारापासूनही लिची संरक्षण मानली जाते. काही संशोधनात असे दिसून आले आहे की या फळाच्या सेवनाने ट्यूमर वाढण्यास प्रतिबंध होतो. यासाठी पुरेसे संशोधन करणे बाकी आहे.

उष्माघातापासून बचाव होतो

लिचीमध्ये भरपूर रस असतो, जो उन्हाळ्यात फायदेशीर ठरतो. लिचीचा रस शरीरातील पाणी भरून काढतो आणि उष्माघातापासून बचाव करतो. भारतासारख्या देशात उष्णता असह्य आहे, ज्यामुळे डिहायड्रेशन आणि उष्माघात होऊ शकतो.

त्वचेच्या संसर्गापासून करते बचाव

लिची व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत मानली जाते. हे अँटिऑक्सिडेंट शरीराला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवते. त्याच्या कमतरतेमुळे खाज सुटणे, त्वचेचा संसर्ग, निर्जीव त्वचा, बरे न होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

शरीर हायड्रेड ठेवते

लिची हे रसरशीत फळ असल्याने ते शरीरातील पाण्याची कमतरता दूर करते. लिचीमधील गुणधर्म आपल्या शरीराला डिहायड्रेड होऊ देत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात याचे जास्त सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: "ज्याची बिश्नोई समाज पूजा करतो, त्याला तुम्ही शिजवून खाल्ले," 'प्रिय सलमान' म्हणत कुणी केली माफी मागण्याची विनंती?

Baba Siddiqui Case: बाबा सिद्दीकींचा मुलगा झीशानसुद्धा टार्गेटवर; मुंबई पोलिसांकडे महत्त्वाचे इनपुट्स

Latest Maharashtra News Updates : कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा! जागा वाटपाबाबत भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक

Baba Siddique Murder: धर्मराज काश्यप अल्पवयीन नाहीच; डाव फसला, 21 तारखेपर्यंत पोलिस कोठडी

Morning Breakfast: पौष्टिक नाश्त्याने करा दिवसाची सुरूवात, बनवा स्वादिष्ट मिसळीचे थालीपीठ, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT