नाग पंचमी दिवशी प्रत्येक घरी काही वस्तू आणल्या जातात. या वस्तू नाग देवांना अर्पण केल्या जातात. त्या वस्तूंमध्ये लाह्या असतात. मक्याच्या, ज्वारीपासून बनलेल्या लाह्यांचा मान नागपंचमी दिवशी असतो.
या लाह्या लहान मुलं आवडीने खातात अन् ते आपल्या आरोग्यासाठीही पौष्टीक असताता. लाह्या खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. यात कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसते. तसेच, या पदार्थात कॅलरी कमी असतात. (Jowar Popcorn Recipe)
त्यामुळे वजन कमी करणारे लोक लाह्या, फुटाणे असे पदार्थ नेहमी खात असतात. डायटमध्येही याचा समावेश केला जातो. या लाह्या नागपंचमीसाठी महत्त्वाच्या असतात. कारण, नाग देवतेला लाह्यांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. तुम्ही ज्वारीपासून घरीसुद्धा लाह्या बनवू शकता. या लाह्या बनवायला अगदी सोप्या असतात. अन् त्या पौष्टीकही असतात.
ज्वारी
पाणी
कढई
एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. ज्वारीच्या तिप्पट चौपट पाणी असायला हवं. पाण्याला चांगली उकळी फुटायला लागली की यामध्ये ज्वारी घाला. आणि यानंतर एक उकळी येण्याची काढा. आता झाकण ठेवून फक्त दोन मिनिटांसाठी ठेवा.
असे केल्याने ज्वारी अधिक टपोरी तयार होते. ज्वारी ठेवायचे नाही लगेचच पाण्यामधूनही काढून घ्यायची. आता ही ज्वारी
निथळून घ्या आणि कापडात गुंडाळून रात्रभर ठेवा. जेव्हा ज्वारीच्या लाह्या बनवणार आहात तेव्हा कढई तापवायला ठेवा. कढई तापली की त्यात मुठभर लाह्या घाला. सुती कापडाने या लाह्या दाबून घ्या.
आता कढईवर एक ताट झाका. संपूर्ण नाही पण थोडी वाफ जाईल असे ताट झाका. आता तुम्ही पाहू शकाल की, सर्व लाह्या उमलत आहेत. अशा पद्धतीने सर्व ज्वारीपासून लाह्या बनवून घ्या. कपभर ज्वारी असेल तर त्याच्या ताटभर लाह्या बनतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.