पीसीओडीमुळे महिलांच्या मासिक पाळीवर आणि प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्यामुळे गर्भधारणा होणे कठीण होते. पीसीओडीमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. महिलांच्या शरीरात प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्सच्या असंतुलनामुळे, अंडाशयात सिस्ट तयार होऊ लागतात.
पीसीओडीची लक्षणे कमी करण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याबरोबरच सकस आहार आणि जीवनशैलीत बदल करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी आहारात अनेक प्रकारच्या पोषक घटकांचा समावेश करणे योग्य ठरते. येथे आम्ही तुम्हाला एका हेल्दी स्मूदीबद्दल सांगत आहोत, जी पीसीओडीची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकते.
अनियमित मासिक पाळी
मासिक पाळी दरम्यान जास्त वेदना होणे
अशक्त वाटणे
वजन वाढणे
स्नायू दुखणे
मूड स्विंग्स
मासिक पाळी दरम्यान डोकेदुखी
शुगर क्रेविंग्स
अँक्झायटी
PCOD ची लक्षणे कमी करण्यासाठी मॅग्नेशियम चांगले मानले जाते. या स्मूदीमध्ये वापरले जाणारे घटक मॅग्नेशियमने भरपूर असतात.
केळ्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. हे सेरोटोनिन हार्मोन तयार करण्यास मदत करते, जे तुमचा मूड नियंत्रित करते.
बदामामध्ये मॅग्नेशियम आणि ओमेगा-3 फॅट्स असतात. जे इंसुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते.
भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि झिंक असते, जे मेंस्ट्रुअल मायग्रेन, जळजळ आणि मसल्स क्रॅम्प्स कमी करतात.
दालचिनी रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो.
कोको हॅप्पी हार्मोन्स रिलीज करण्यास मदत करते. जे मूड सुधारते आणि अँक्झायटी कमी करते.
नारळाचे पाणी बद्धकोष्ठता दूर करते आणि इस्ट्रोजेन डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते.
लागणारे साहित्य
केळी - 1 लहान
बदाम - 5 भिजवलेले
भोपळ्याच्या बिया - 1 टीस्पून भिजवलेले
दालचिनी - 1 चिमूटभर
कोको पावडर - 1 टीस्पून
नारळ पाणी - 200 मिली
कसे बनवावे?
सर्वकाही एकत्र करून ते ब्लेंड करा.
तुम्ही दिवसातून एकदा ते पिऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.