Best Time for Yoga Esakal
लाइफस्टाइल

Best Time for Yoga : ‘या’ वेळी Yoga करणं ठरतं अधिक फायदेशीर? जाणून घ्या योगासाठी Best time कोणता?

Best Time for Yoga: योगाचे अनेक फायदे आहेत. मात्र जर तुम्ही योग्य वेळेस योगा केलात तर तुम्हाला त्याचे दुप्पट फायदे मिळू शकतात

Kirti Wadkar

Best Time for Yoga: आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी Healthy Life रोजच्या दिनचर्येत व्यायाम किंवा योगा करण्याचे अनेक फायदे असतात. गेल्या काही वर्षांपासून वर्कआउटसाठी अनेकजण योगाचा पर्याय निवडू लागले आहेत. Healthy Tips Marathi what is good time to do yoga

केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आता योगाचं Yoga महत्व लोकांच्या लक्षात येऊ लागलं आहे. योगामुळे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्य Mental Health चांगलं राहण्यास मदत होते. यासाठी नियमितपणे योगा करणं अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरतं.

योगाचे अनेक फायदे आहेत. मात्र जर तुम्ही योग्य वेळेस योगा केलात तर तुम्हाला त्याचे दुप्पट फायदे मिळू शकतात. खरं तर व्यायाम किंवा योगा काही ठराविक वेळेस केल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात.

अलिकडे धकाधकीच्या जीवनशैलीत मिळेल त्या वेळेत लोक व्यायाम करण्यासाठी वेळ काढत असले तरी शक्य असल्यास योग्य वेळेत योगा केल्यास शरीर अधिक निरोगी राहण्यास मदत होते.

यावेळी योगाचे मिळतील फायदे

सकाळच्या वेळी योगा करणं चांगलं असतं या विचाराने अनेकजण सकाच्या वेळी योगा करतात. मात्र सकाळीदेखील एका ठराविक वेळी योग करण्याचे शरीरासाठी काही विशिष्ट फायदे आहेत. सकाळी योग करण्याची सगळ्यात योग्य वेळ आहे ती म्हणजे ब्रह्म मुहूर्त आणि त्यानंतरचे २ तास. म्हणजे पहाटे ४ ते सकाळचे ७ या वेळेत योगा करावा.

हे देखिल वाचा-

पहाटेच्या वेळी आपलं शरीर अत्यंत फ्रेश असतं. यावेळी एखादा बदल स्विकारण्यास शरीर संपूर्णपणे तयार असतं. तसचं यावेळी आपलं पोटही रिकामं असतं. त्यामुळे यावेळी आपण जी योगसाधना करतो तिची संपूर्ण शरीराला आणि मानसिक आरोग्याला फायदा मिळतो.

४ ते ७ या वेळेत योगा करण्याचे शरीराला आणि मानसिक स्वास्थ्यास कोणते फायदे होतात हे जाणून घेऊयात.

शारिरीक फायदे- ब्रह्म मुहूर्त किंवा त्यानंतरच्या दोन तासात योग केल्याने शारीरिक कार्य सुधारतं आणि रक्ताभिसरण गतिमान होण्यास मदत होते. योगामध्ये श्वासोच्छवास हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. या वेळेत योगा केल्याने तुम्हाला श्वसनाद्वारे शुद्ध हवा मिळते. यामुळे तुमच्या शरीरातील प्राणवायू शुद्ध होण्यास मदत होते. यामुळे संपूर्ण दिवसासाठी तुम्हाला ऊर्जा मिळते आणि तुम्ही फ्रेश रहाता.

तसचं यावेळेत योगा केल्याने हृदय, किडनी आणि लिवरचं कार्य देखील सुधारतं. त्यामुळे जर तुम्हाला उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आजारांपासून सुटका हवी असेल तर यावेळी योगा करणं फायदेशीर ठरेल.

मानसिक फायदे- सकाळी ४ ते ७ या वेळेत योग केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळते. सकाळच्या शुद्ध आणि ताज्या हवेत योग केल्याने मन शांत होतं तसचं तुमचं मन डिटॉक्स होण्यास मदत होते.

यावेळेत योगा केल्याने मनावरील ताण कमी होण्यास मदत होते आणि मन एकाग्र करण्याची क्षमता वाढते. खास करून चिंता, नैराश्य किंवा कोणतेही दु:खी विचार मनातून काढून टाकण्यासाठी पहाटे योगा करणं फायदेशीर ठरतं. यामुळे मेंदूची ताकद वाढण्यास मदत होते.

त्यामुळेच जर तुम्हाला योगाचा अधिक लाभ करून घ्यायचा असेल तर पहाटेची वेळ निवडा. अर्थात यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये योग्य बदल करून रात्री देखील योग्य वेळेत झोपण्याची सवय लावावी लागेल. मात्र यामुळे तुमची एकंदरच जीवनशैली बदलून त्यातून तुमच्या आरोग्याला केवळ फायदेच मिळू शकता हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Vote Counting: ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये तफावत का आढळली? मोठी अपडेट आली समोर

Rapper Badshah : रॅपर बादशहाच्या नाईट क्लबमध्ये स्फोट, हल्लेखोर मोटारसायकलवर आले अन्... पोलिसांकडून मोठा खुलासा

3 balls 30 runs! गोलंदाजाला ठोकून काढले; बरं झालं, हा आयपीएल ऑक्शनमध्ये Unsold राहिला

Healthy Recipe :  हिवाळ्यात चायनिज सूपपेक्षा जास्त फायदेशीर ठरतील शेंगोळ्या, पारंपरिक शेंगोळ्यांची रेसिपी पटकन सेव्ह करा

IND vs AUS : पर्थ कसोटी जिंकताच गौतम गंभीर तातडीने मायदेशात परतला, नेमकं असं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT